हडपसर/पुणे प्रतिनिधी :
रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेज हडपसर येथील राष्ट्रीय सेवा योजना युनिट, वनस्पतिशास्त्र विभाग आणि ए. यू. स्मॉल फायनान्स बँक, मगरपट्टा यांच्या संयुक्त विद्यमाणे जागतिक पर्यावरण दिन – वृक्षारोपण मोहीम दिनांक ०५ जून २०२५ रोजी आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय औंधचे मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ.तानाजी हातेकर उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश साळुंखे उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे म्हणाले की, पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि मानवी जीवनाच्या उन्नतीसाठी वृक्ष लागवड महत्त्वाची आहे. तसेच वृक्षारोपणाच्या माध्यमातून संपूर्ण कॉलेज ग्रीन कॅम्पस करण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना दिली.
कार्यक्रमाचे आयोजन वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ.विलास कांबळे, प्रा.स्वप्नील ढोरे (एन.एस.एस. सदस्य) आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व सदस्यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.
कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेतला. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. संजय जगताप, प्रा.फुलचंद कांबळे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविद्यालयाच्या परिसरामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक व विद्यार्थ्यांनी २० हून अधिक पर्यावरणपूरक प्रजातींची झाडे लावण्यात आली. ज्यामुळे कॅम्पसचे पर्यावरणीय मूल्य समृद्ध होण्यास मदत झाली आहे.