पैठण(प्रतिनिधी):बालानगर येथे हुमना पिपल टु इंडियातर्फे सर्व रोगनिदान शिबीर संपन्न झाले . बालानगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हुमनापिपल टु इंडियातर्फे सर्व रोगनिदान मेगा कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.
बालानगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हुमना पिपल टु इंडियातर्फे सर्व रोगनिदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.शिबीराचे उदघाटन उपसरपंच बद्रिनाथ गोर्डे व ग्रामविकास अधिकारी नितीन निवारे यांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबिरामध्ये रूग्णांची उच्च रक्तदाब, मधुमेह,मानसिक आरोग्य समस्या,क्षयरोग, कर्करोगाची तपासणी करण्यात आली.यावेळी हुमना पिपल टु इंडियाचे टिम लिडर शंकर गुर्जर,मनिषा खवाटे,ग्रेटा किरण कदम,अमिषा कृपालानी,रिमा गरुड,डाॅ.चेतन दुबे,डाॅ.रचना पौळ, ग्रा.पं.सदस्य आरेफभाई शेख,मच्छिंद्र गल्हाटे,वैद्यकीय अधिकारी डाॅ.शंकर धंदे,आरोग्य सहायक शंकर छबिलवाड,लहिवाल,कवचट,मुदलकर, लिपने,आव्हळे,अनिता गोर्डे,गोधने,सचिन गोर्डे,बाबासाहेब कदे यांच्यासह रूग्नांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.