कराड तालुका निवडी जाहीर होणार !
अनिल वीर सातारा : जिल्हा रिपब्लिकन सेनेच्या सहविचार सभेत जाहीर पक्ष प्रवेश व कराड दाक्षिण व उत्तर या विभागातील तमाम आंबेडकरी विचारधारा आणि आंबेडकरी चळवळीत काम करू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यानी रविवार दि.२० रोजी सकाळी ११ वा.शासकीय विश्रामगृह,कराड येथे उपस्थीत रहावे.
रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचे प्रगल्भ नेतृत्वात रिपब्लिकन सेना या राजकीय पक्षाचा झंझावात संपुर्ण महाराष्ट्रभर जोर धरत आहे.या अनुषंघाने सातारा जिल्हा रिपब्लिकन सेनेच्यावतीने पक्षाचे राज्य नेते,सातारा- सोलापुर-कोल्हापुर जिल्हा प्रभारी व निरीक्षक चंद्रकांत खंडाईत(आप्पा) तसेच रिपब्लिकन सेना सातारा जिल्हाध्यक्ष सुनिल कदम , सरचिटणिस दादासाहेब केंगार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या सहविचार सभेत कार्यकर्त्याचा पक्ष प्रवेश होणार असून कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे.तेव्हा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनी उपस्थीत रहावे. असे आवाहन संयोजकातर्फे निलेश थोरवडे (जिल्हा सचिव),उपसरपंच दादासाहेब कांबळे (जिल्हा उपाध्यक्ष) व मिलिंद सावंत (जिल्हा कोषाध्यक्ष) यांनी केले आहे.