
माहूर : माहूर नगरीचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी व परिवाराच्यावतीने गुरुवारी ईद-ए-मिलन समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. सदरील कार्यक्रमास माजी आमदार प्रदीप नाईक यांच्यासह तहसीलदार किशोर यादव व जवळपास सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
ईद हा आनंदाचा व उत्साहाचा सण मानला जातो. या उत्सवात सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणून आनंद द्विगुणीत करण्याचा संकल्प नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी केला होता त्या संकल्पप्रमाणे गेल्या दहा वर्षापासून ईद-मिलन समारोहाचे आयोजन करण्यात येते.
गुरुवारी दुपारी बारा वाजता ईद मिलन समारोहस प्रारंभ करण्यात आला. किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार प्रदीप नाईक यांचे स्वागत नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी केले. तसेच तहसीलदार किशोरी यादव नगरपंचायत चे मुख्याधिकारी डॉक्टर राजकुमार राठोड,गटविकास अधिकारी सुरेश कांबळे, पोलीस निरीक्षक नितीन काशीकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आशिष पवार यांचे स्वागत हाजी कादर दोसानी झोनल सेक्रेटरी विदर्भ मेमन जमात यांनी केले. तर उपस्थित पत्रकार, प्रतिष्ठित नागरिक यांची स्वागत अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सरफराज दोसांनी युवा उद्योजक जुनेद दोसानी यांनी केले.
ईद मिलन समारोहामध्ये शीरखुर्मा सह विविध प्रकारच्या मिष्ठांन पदार्थाचा आस्वाद उपस्थितानी घेतला. यावेळी माहूर पंचायत समितीचे माजी सभापती हाजी उस्मान खान पठाण, माजी नगराध्यक्ष समरभाऊ त्रिपाठी,युवा नेते यश खराटे, प्रकाश गायकवाड,गोविंदराव मगरे पाटील, लांजी येथील सरपंच मारोती रेकुलवार, रऊफ भाई सौदागर, माजी प्राचार्य भगवानराव जोगदंड पाटील, निरधारी जाधव, शारदासुत खामनकर, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष विजय आमले,वसंतरावजी कपाटे, ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार संतान, शिक्षक संघटनेचे एस. एस. पाटील, अधीक्षक वैजनाथ स्वामी, लेखापाल संदीप थोरात, देविदास सिडाम, माजी उपाध्यक्ष अब्दुल मुनाफ भाई, माजी नगराध्यक्ष शितल जाधव, बाजार समितीचे माजी सभापती दत्तराव मोहिते, राष्ट्रवादीचे माहूर तालुकाध्यक्ष मेघराज जाधव, विधानसभा सरचिटणीस मनोज कीर्तने, पंचायत समितीचे माजी सभापती उमेश जाधव, अमजद भाई पठाण ( वाई)यांच्यासह नगरसेवक, व्यापारी, शहरातील प्रतिष्ठित नागरिक, कर्मचारी, विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे आभार अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सरफराज दोसांनी यांनी मानले.