देवळाली प्रवरा /प्रतिनिधी :
राहुरी शिंगणापूर रस्त्यावर वाढत्या अपघातांमुळे बळींची ची संख्या लक्षात घेता या रस्त्यावर तात्काळ स्पीड ब्रेकर व माहिती फलक लावण्यासाठी आज माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली उंबरे येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. शनिशिंगणापूर- राहुरी रस्त्यावर वाढत्या अपघातात वाढलेल्या बळी मुळे रस्त्यावर डिव्हायडर पाहिजे , रिफ्लेक्टर ची आवश्यकता आहे . राहुरी तालुक्याचे विद्यमान आमदार माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी रास्ता रोको आंदोलन करून सरकारचे याकडे लक्ष वेधले रस्त्यावर सात ते आठ गाव आहेत कोठेही दिशादर्शक व माहिती दर्शक फलक नाहीत . गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यावर अपघात वाढले असून राहुरीतील नागरिकांचा यामुळे बळी जात आहे .
बाहेरील भक्तांची वाहने या रस्त्याने जात असल्याने दिशादर्शक व माहिती फलक नसल्याने वेगाचा अंदाज न आल्याने अनेक अपघात झालेली आहे . या रस्त्यावर प्रत्येक गावात स्पीड ब्रेकर रिफ्लेक्टर व माहिती फलक लावावे या मागणी अशी मागणी माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केले रास्ता रोको मुळे दोन्ही बाजूने भाविकांच्या व प्रवाशांच्या दूरवर दूर दूरवर उभे होते .