एस जे एस रुग्णालयात नवीन  वर्षाच्या चार महिन्यात ६०० हून अधिक शस्त्रक्रिया

0

९०० हून अधिक डायलेलीस व २५० हून अधिक नवजात बालकांवर मोफत उपचार यशस्वी

कोपरगाव प्रतिनीधी :

कोपरगाव तालुक्यात नामांकित श्री जनार्दन स्वामी रुग्णालयात जानेवारी २०२३ पासून ते एप्रिल २०२३ पर्यंत मेंदूच्या शस्त्रक्रिया ७१,मूत्रपिंडाच्या ६९,अति जोखमीच्या शस्त्रक्रिया३८,आस्थिरोग शस्त्रक्रिया ९५, डोळ्याच्या शस्त्रक्रिया ८२, हृदयाच्या शस्त्रक्रिया ३२ रेडिएशन ३५,केमोथेरपी६०,कर्करोगाच्या शस्त्रक्रिया २७, २५० हून अधिक नवजात बालकांवर मोफत उपचार करण्यात आले वरील प्रमाणे एकूण शस्त्रक्रिया ६६६ झाल्या आहेत. सर्व विभागामिळून १८१६ रुग्णांवर उपचार करण्यात आले.

    जस जशी वर्षे ओलांडली तस तसे विज्ञान प्रगत झाले.आणि आता कर्करोगापासून वाचविणारे अनेक उपचार आले आहेत.अश्यातच कर्करोगाच्या रुग्णांसाठी वरदान ठरणारे एस जे एस रुग्णालय प्रशासनाने रेडिएशन थेरपी केंद्र नव्या वर्षात रुग्ण सेवेसाठी सज्य झाले आहे.अमेरिका सारख्या देशात रेडिएशन थेरपीचा एक वेळचा खर्च १० ते १२ लाखापर्यंतच्या घरात जातो.परंतु एस जे एस रुग्णालयात मात्र रुग्णांवर मोफत उपचार केले जात आहे.त्यासाठी लागणारे रेडिएशन थेरपी साथीचे पूर्णपणे म्हणजे १०० टक्के इमेज गाईडेड रेडिओ थेरपी मशीन आता एस जे एस रुग्णालयात उपलब्ध झाले आहे.यामुळे अचूक उपचार करणे शक्य होते.

रुग्णालयात २४ तास तज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित असते. सिटीस्कॅन, एम आर आय, डिजिटल एक्सरे,सोनोग्राफी या सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. सुसज्य लॅब विभाग आहे.यात सर्व प्रकारच्या रक्ताच्या व इतर चाचण्या अगदी कमी दरात होतात. डोळ्यांच्या शस्त्रक्रिया अतिशय कमी दरात होतात. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना लागू असल्याने खेड्या पाड्यातील गरीब कुटुंबातील रुग्ण या रुग्णालयात मोफत उपचार घेत आहेत.नॉर्मल डिलिव्हरी सिजेरीयन अगदी मोफत होत आहे.सर्व तज्ञ व अनुभवी डॉक्टर्स व कर्मचारी यांच्या सहाय्याने हे सर्व शक्य झाले आहे.एस जे एस रुग्णालय रुग्णांसाठी वरदानच ठरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here