0

सर्वोच्च न्यायालयातील तीन न्यायाधीशांच्या विशेष पीठासमोर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांच्या जामीन अर्जाची सुनावणी होणार आहे.

जस्टीस बी आर गवई यांच्या अध्यक्षतेखालील विशेष पीठासमोर आज (1 जुलै) ही सुनावणी होणार आहे. तीस्ता सेटलवाड यांना अंतरिम जामीन मंजूर करण्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या पीठामध्ये एकमत झालं. त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी तीन न्यायाधीशांच्या पीठासमोर करावी, ही मागणी करणारी याचिका सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्यासमोर सादर करण्यात आली.

दोन न्यायाधीशांच्या पीठामध्ये मतभेद असल्याने हे प्रकरण तीन न्यायाधीशांच्या पीठासमोर सुनावणीसाठी आणण्यात आलं आहे.

शनिवारी (1 जुलै) सर्वोच्च न्यायालयाला सुट्टी होती, मात्र तीस्ता सेटलवाड यांच्या याचिकेनंतर या प्रकरणावर विशेष सुनावणी घेण्यात आली.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे की, उच्च न्यायालयात सरेंडर करण्यासाठी तीस्ता सेटलवाड यांना थोडा वेळ दिला जावा.

सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे की, “सप्टेंबर 2022 मध्ये सुप्रीम कोर्टाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्यानंतर नऊ महिन्यांपासून त्या जामीनावर बाहेर आहेत. या प्रकरणी सोमवार किंवा मंगळवारीही सुनावणी केली जाऊ शकते. पुढच्या 72 तासांमध्ये असं काय घडणार आहे?”

मात्र गुजरात सरकारच्या वतीने युक्तिवाद करत असलेले महाधिवक्ता तुषार मेहता यांनी या युक्तिवादाला विरोध केला. त्यांनी म्हटलं की, सेटलवाड यांना अंतरिम जामीन मिळणं योग्य नाही. कारण त्यांनी सरकारविरुद्ध संवेदनशील आरोप करण्यासाठी बनावट कागदपत्रं बनवली, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या साक्षी फिरवल्या आणि न्याय व्यवस्थेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला.

2002 च्या गुजरात दंगल प्रकरणात षडयंत्र केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणात तीस्ता सेटलवाड यांना सप्टेंबर 2022 मध्ये सुप्रीम कोर्टाने अंतरिम जामीन मंजूर केला होता.

अंतरिम जामीनामुळे इतके दिवस त्यांची अटक टळली होती. भारताचे सरन्यायाधीश (CJI) उदय उमेश लळित यांच्या अध्यक्षतेखालील न्यायमूर्ती एस रवींद्र भट आणि सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठाने तीस्ता सेटलवाड यांना अंतरिम जामिनाचा आदेश दिला होता.

या प्रकरणी 2 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत कोर्टाने तीस्ता सेटलवाड यांना सशर्त अंतरिम जामीन मंजूर केला होता. पण, आता गुजरात हायकोर्टातील न्यायाधीश निर्झर देसाई यांनी सेटलवाड यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्या अंतरिम जामिनावर बाहेर असून त्यांनी तत्काळ आत्मसमर्पण करावं, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here