नाशिक :नागापूरचे लोकनियुक्त सरपंच राजाभाऊ पवार यांना लोकमत वृत्त समुहाचे वतीने लोकमत २०२३ लोकनेता पुरस्कार दि.३०/०७/२०२३ रोजी नाशिक येथील हॉटेल एक्स्प्रेस इन येथे जिल्ह्याचे पालकमंत्री दादासाहेब भुसे, पद्मश्री पोपटराव पवार, सिनेमा अभिनेत्री सुनिता तांबे, बी.बी.चांडक , संपादक मिलिंद कुलकर्णी यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
तेल कंपन्यांमुळे नावारूपास आलेल्या ग्रामपंचायतीत 2003 साली राजाभाऊ पवार सरपंच झाले. तेव्हापासून गावाचा झपाट्याने विकास झाला. त्यावेळेस गावाला राज्याचा निर्मल ग्राम पुरस्कार तसेच देशपातळीवर राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. त्यांनी गावात आदिवासींसाठी स्लॅबची घरे बांधली. शौचालयाची उभारणी केली. व जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर गावाबरोबरच गटाचा देखील मोठा विकास केला आहे.गटातील सर्व वस्ती शाळांना 36 इमारती उभारल्या आहे . प्राथमिक आरोग्य केंद्राचे नूतनीकरण केले, 16 सिमेंट बंधारे बांधले, चार पशुवैद्यकीय दवाखाने उभारले, शेतकरी वर्गाला लाभधारक योजना दिल्या, दलित वस्ती सुधार निधी योजना प्रत्येक गावात राबवल्या दहा गावांमध्ये पाणीपुरवठा योजना पूर्ण केल्या. नागपूर गावाबरोबरच त्यांनी जवळच्या 35 गावांचा विकास त्यांच्या माध्यमातून झाला आहे ही एक अभिमानास्पद बाब आहे. प्रशासन चालवण्याचा एक मोठा अनुभव त्यांच्याकडे आहे.आता पुन्हा नागापूर गावचे लोकनियुक्त सरपंच झाल्यानंतर कोट्यावधी रुपयांची कामे या ठिकाणी मंजूर केली व प्रत्यक्षात कामांना सुरुवात झाली या संपूर्ण कामाचा आढावा घेत लोकमत वृत्त समूहाने काल त्यांना लोकनेता पुरस्काराने सन्मानित केले आहे. पंचक्रोशी त त्यांचे सर्वत्र कौतुक केलं जात आहे. तालुक्याचे आमदार सुहास आण्णा कांदे यांनी त्यांचं अभिनंदन केले आहे.