येवला येथे  भारत मातेच्या विर जवानांना वंदन करण्यासाठी रक्तदान शिबीराचे आयोजन.

0

        येवला प्रतिनिधी  :

भारत भूक्षणासाठी विरांनी आपल्या घरावरती तुळशीपत्र ठेवत स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सुरू केलेल्या यज्ञामध्ये आपल्या प्राणाची आहुती दिली, कुणी रक्त वाहिलं.. तेव्हा कुठे आपल्याला इंग्रजांच्या जुलमी राजवटीपासून स्वातंत्र्य मिळालं. या वीरांना आदरांजली वाहण्यासाठी त्यांना वंदन करण्यासाठी  १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी श्री शिवशंभूचे वारकरी परिवाराच्या वतीने रक्तदान शिबिराच आयोजन येवला येथे करण्यात आलं होतं.येवला पंचायत समितीचे सभापती प्रविण गायकवाड यांनी रक्तदान करत ,श्री शिवशंभूचे वारकरी परिवाराचे कौतुक करताना म्हटले की,ही मुलं फक्त रक्तदान शिबीराचे आयोजनच करत नाही तर गरजूंना वेळ रक्ताची गरज भासल्यास त्याची पुर्तता ही करतात‌. आजकाल तरुणांनी अशा समाज उपयोगी कार्यात सहभाग घेतला पाहिजे कारण रक्तदान हे अतिशय महत्त्वाचे दान आहे त्यामुळे एखाद्या माणसाला जीवनदान मिळते त्याच्यासारखा पुण्य नाही असं मत व्यक्त केले

          आयोजित रक्तदान शिबीरात 55 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला.सर्व रक्तदात्यांचे व संजीवनी ब्लॅड बॅंकचे श्री शिवशंभूचे वारकरी परिवाराचे संस्थापक संदीप बर्शिले यांनी आभार मानले.शिबीराच्या यशस्वी आयोजनासाठी रविद्र बिडवे ,गणेशराजे सोमासे, जालिंदर कोटमे, संदिप जाधव, अमोल खराटे, गणेश वारुळे,सागर नाईकवाडे यांनी परीश्रम घेतले तर दिपक देशमुख सर, महेश शेटे यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here