कोपरगाव दि.
स्थानिक के. जे. सोमैया महाविद्यालयाचा विद्यार्थी अभिषेक आण्णासाहेब वाकचौरे हा विमलाबेन खिमजी तेजूकाया महाविद्यालय देवळाली, नाशिक येथे आयोजित विद्यापीठस्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम (रुपये ४००१/- प्रशस्तीपत्र आणि ग्रंथ) क्रमांकाच्या पारितोषिकाचा मानकरी ठरला आहे, अशी माहिती प्रभारी प्राचार्य डॉ. एस. आर. पगारे यांनी दिली.
अभिषेक वाकचौरे याच्या या यशाबद्दल को. ता. एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, सचिव अॅड्. संजीव कुलकर्णी, विश्वस्त संदीप रोहमारे, प्राचार्य डॉ. बी. एस. यादव, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख प्रो. डॉ. व्ही. सी. ठाणगे, रजिस्ट्रार डॉ. अभिजीत नाईकवाडे यांनी अभिनंदन केले आहे.
या विद्यार्थ्याला वांग्मय मंडळाचे प्रमुख प्रो. डॉ. जिभाऊ मोरे, डॉ .गणेश देशमुख आदींचे विशेष मार्गदर्शन लाभले.