राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी माणुसकी वृध्दाश्रमात गाडगेबाबाना विनम्र अभिवादन

0

पैठण,दिं.२०.(प्रतिनिधी):राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने माणुसकी समुहाच्या वतीने माणुसकी वृध्दाश्रमात गाडगेबाबाना विनम्र अभिवादन करण्यात आले.

  गाडगेबाबांच्या पुण्यतिथी निमीत्ताने सपोनि आरती जाधव यांच्या वतीने माणुसकी वृध्दाश्रमाला किराणा साहित्य भेट देण्यात आली .यावेळी गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

समाजसेवक सुमित पंडित यांनी गाडगेबाबांची प्रेरणा घेवून समाजसेवेला सुरवात केली आहे. संत गाडगे बाबांचे प्रेरणादायी विचार अडाणी राहू नका,मुला-बाळांना शिकावा,जो वेळेवर विजय मिळवतो तो जगावरही विजय मिळवतो,दगड धोंड्यांची पूजा करण्यात वेळ आणि शक्ती वाया घालवू नका,दान घेण्यासाठी हात पसरू नका,दान देण्यासाठी हात पसरा,दु:खाचे डोंगर चढल्याशिवाय सुखाचे किरण दिसत नाही,धर्माच्या नावाखाली कोंबड्या बकऱ्या सारखे मुके प्राणी बळी देवू नका,माणसाचे खरोखर देव कोण असतील तर ते आई बाप,माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागावे हाच बोध मी ग्रहण केला आहे,

शिक्षणाने माणसाचे जीवन फुलते आपण ह्या जगात कशासाठी आलोत हे कळते,शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे.तर याप्रसंगी  उपस्थिताना श्रीमती वर्षा व्हगाडे सपोनि रेल्वे लोहमार्ग व सपोनि आरती जाधव दामीनी पथक ग्रामीण छत्रपती संभाजीनगर यांनी गाडगेबाबा यांचे वीचार सांगीतले यावेळी माजी सरपंच पुनम चव्हाण, समाजसेवक सुमित पंडित, अरुण महाराज,नंदु चव्हाण, सचिन राठोड,रमेश राठोड, सुनिल चव्हाण,प्रा.शरद  सोनवणे,सौ पूजा पंडित सह माणुसकी वृध्दाश्रमातील वृद्ध सह आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here