श्री गणेश कारखान्याच्या एक लाख एकावन्न हजारव्या पोत्यांचे विवेक कोल्हे यांच्या हस्ते पूजन 

0

राहता प्रतिनिधी  : श्रीगणेश सह साखर कारखाना प्रगती करत असून कारखाना कार्यस्थळावर नुकतेच एक लाख एकावन्न हजार साखर पोत्यांचे पूजन जिल्हा बँकेचे संचालक युवानेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. 

शेतकरी सभासदांच्या अपेक्षांचा विश्वास जोपासून श्रीगणेश कारखान्याची अनेक संकटे आल्यानंतर देखील ही यशस्वी वाटचाल सुरू आहे.या प्रगतीमध्ये सर्वांचे मोलाचे योगदान आहे. अनेक बदल करून नाविन्यता आणत काम सुरू आहे. स्पर्धेच्या युगात कारखान्याची प्रगती होण्याच्या दृष्टीने भविष्यात अधिक सकारात्मक प्रयत्न सुरू राहतील असा विश्वास त्यांनी उपस्थितांना दिला.ज्या भावनेने सभासदांनी सेवेची संधी दिली होती त्या दृष्टीने पावले टाकली असून त्याचे सकारात्मक बदल झाले आहेत.कारखाना सुस्थितीत प्रगती पथावर रहावा या समाधानकारक प्रगतीसाठी घेतलेली मेहनत फळाला येताना दिसत आहे असे यावेळी विवेक कोल्हे म्हणाले.

अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सुरू केलेला हंगाम पूर्वतयारी करतांना झालेल्या नियोजनामुळे व्यवस्थित पार पडतो आहे.सर्व संचालक मंडळ जोमाने काम करत आहे व अधिकाधिक गाळप होण्यासाठी प्रयत्नशील आहे अशी भावना संचालकांनी व्यक्त केली.

या वेळी चेअरमन सुधीर लहारे, व्हा.चेअरमन विजयराव दंडवते,सर्व संचालक मंडळ तसेच, माजी व्हा. चेअरमन शिवाजीराव लहारे,डॉ.एकनाथ गोंदकर,संजय गाढवे,भिकाजी घोरपडे,निलेश कार्ले, विक्रम वाघ,कार्यकारी संचालक,सभासद,कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here