कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे तुकाराम बाबुराव गुडघे यांचे नातू साहील दिलीप गुडघे यांचा गुरुवारी संध्याकाळी सहा वाजता सिन्नर संगमनेर जुन्या रोडवर सोनवणे पेट्रोल पंपाच्या बाजूला स्विफ्ट कारने दिलेल्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
गुरुवारी सायंकाळी सात वाजता मेस वरून जेवण करून तो रूमवर आपल्या पल्सर MH 17 9767 या गाडीवरून चालला असताना समोरून आलेल्या स्विफ्ट कारणे त्याला धडक दिली असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. एम फार्म शिक्षण पूर्ण करून तो सध्या अमृतवाहिनी कॉलेजला प्राध्यापक म्हणून इंटर्नल शिप मध्ये सेवा देत होता. एक एप्रिल पासून त्यांची एचओडी म्हणून ऑर्डर पण निघाली होती. मात्र दुर्दैवाने अपघातात त्याचा मृत्यू झाला.
एक हात व पायाला मोठी जखम झाल्यानंतर उपचारासाठी पसायदान ॲम्बुलन्स मधून मधुकर वारुंगसे, पुरुषोत्तम भाडझिरे यांनी यशवंत हॉस्पिटल ला हलवले. मात्र प्रकृती गंभीर असणारे असल्याने रात्रीस त्यास नाशिक येथे हॉस्पिटल मध्ये हलवले. बारा तास मृत्यूशी झुंज देत असताना साहिल याचा रक्तस्राव जास्त झाल्याने शुक्रवारी सकाळी सहा वाजता दुर्दैवी मृत्यू झाला. अत्यंत हुशार मनमिळाऊ स्वभावाच्या साहिलचा 24 व्या वर्षी मृत्यू झाल्याने सोनेवाडी गावावर शोककळा पसरली आहे.
तीन महिने वैयक्तिक करिअरची सुरुवात करणाऱ्या साहिलने शेवटचा फोन गुरुवारी संध्याकाळी सहा वाजता आपल्या आईला वैशालीताई यांना फोन केला व मी सुट्टी काढून पाडव्याला घरी येतो म्हणून सांगितले. आणि काही क्षणात त्याच्या अपघाताची बातमी त्यांच्या कानावर पडली.
साहिल गुडघे यांच्या पश्चात आजी आजोबा चुलते बंधू बहिणी असा मोठा परिवार आहे. शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर सोनेवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.