पैठण (प्रतिनिधी): पैठण पंचायत समिती अंतर्गत पाणीटंचाई बैठक आमदार विलास बापू भुमरे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. पैठण पंचायत समितीच्या अंतर्गत पाणी टंचाई विभाग, पाणीपुरवठा उपविभाग व मग्रारोहयो यांचे संयुक्त विद्यमाने आमदार विलास भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली पाणीटंचाई आढावा बैठक अभिनंदन मंगल कार्यालयात संपन्न झाली.
सदर बैठकीस उपस्थित तालुक्यातील सरपंच व ग्रामसेवक,नागरीक यांनी पाणी टंचाईच्या अनुषंगाने आवश्यक त्या सुचना करून पाणी टंचाई बाबत उपाय योजना करण्याबाबत मागणी केली यावेळी उपविभागीय अधिकारी निलम बाफमा, मग्रारोहयो च्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नंदनवनकर , कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद अजित वाघमारे, गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड, बांधकाम विभागाचे उप अभियंता संभाजीराव असोले, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग उप अभियंता सागर बेहरे, तालुका कृषी अधिकारी विकास पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी राजेश कांबळे, तहसीलदार दिनेश झंपले,नायब तहसीलदार राहूल बनसोडे, पुरवठा अधिकारी बहूरे, राधाकृष्ण चौधरी, बळीराम राठोड, दशरथ खराद, सुनील इंगळे सह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार विलास बापू भुमरे पाटील यांनी पाणीटंचाईच्या अनुषंगाने नागरीकांना पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी अधिका-यांनी योग्य त्या उपाययोजना तात्काळ करण्यात याव्यात ज्या गावास पिण्याच्या पाण्याच्या टॅकरची आवश्यकता आहे तेथे आठ दिवसांच्या आत प्रस्ताव मंजूर करून पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावे.
सदर बैठक यशस्वी करण्यासाठी ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष तथा ग्रामपंचायत अधिकारी खंडू वीर,संजय पवार, ईश्वर सोमवंशी, रमेश आघाव,सागर डोईफोडे, नानासाहेब मतसागर, राहूल वाघ, संदीप घालमे, बबन हलगडे, शिवराज गायके, नामदेव दांडगे, विनायक इंगोले, रजनिकांत पोकले, नितीन निवारे,येडूबा कांबळे, नारायण पाडळे, किशोर निकम, सुहास पाटील, विजय वाघ,संपत अवसरमल,राजु दिलवाले, ज्ञानेश्वर गिरी,अभिजित शिंदे, संजय साबळे सह मंडळ अधिकारी,कृषी सहाय्यक,तलाठी, पाणीपुरवठा अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चांगतपुरी येथील युवा माजी सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक साईनाथ होरकटे यांनी चांगतपुरी येथील गावात खारे पाणी असल्याने तेथे तात्काळ टॅकरव्दारे शुध्द पिण्याचे पाणी पुरविण्याची मागणी केली व गावात सुरू असलेल्या जलजीवन कामे दर्जेदार होण्यासाठी अधिकारी यांनी लक्ष देण्याची मागणी केली.