सिन्नर प्रतिनिधी विद्यार्थ्यांना अध्यात्मिकतेची व आधुनिकतेची सांगड घालून मूल्य रुजविली तर विद्यार्थी दशेत चांगले संस्कार घडतील . आणि हे संस्कार घडण्यासाठी जीवनाचे चार टप्पे त्यांनी सांगितले. या चार टप्प्यात काय करायचे हे अध्यात्मिकेतून सांगितले. ब्रम्हचर्य आश्रम गृहस्थाश्रम,वानप्रस्थाश्रम व सन्यास आश्रम ब्रह्मचर्यमध्ये अभ्यास करणे अशाप्रकारे प्रत्येक आश्रमाचे कार्य हेतु उदाहरण दाखल स्पष्ट केले तसेच पहिल्या टप्प्यात लर्निग दुसऱ्या टप्प्यात अर्निग तिसऱ्या टप्प्यात टर्निग चौथ्या टप्प्यात नो रिटनिंग अशाप्रकारे समाजात गुरुकुल शिक्षणाची गरज आहे. भरकटलेल्या तरुणांना सुसंस्कारीत करण्यासाठी गुरुकुल शिक्षणाची गरज आहे .मोबाईलचे व्यसन तरुणांसाठी घातक आहे.हे व्यसन दूर करण्यासाठी अध्यात्मिकतेची गरज आहे.असे प्रतिपादन केले. पाताळेश्वर माध्यमिक विद्यालय पाडळी येथे ह.भ.प.किशोर महाराज खरात यांचे प्रवचन संपन्न झाले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना संबोधताना ते बोलत होते.
यावेळी बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.बी.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांवर संस्काराची जोपासना केली जात असल्याची माहिती देण्यात आली.
याप्रसंगी व्यासपीठावर आदिनाथ शिंदे,वसंत रंगनाथ रेवगडे,बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे कोषाध्यक्ष व विद्यालयाचे उपशिक्षक टी.के.रेवगडे, बी.आर.चव्हाण, आर.व्ही. निकम, एस.एम. कोटकर,आर.टी.गिरी,एम.एम.शेख,सविता देशमुख, सी.बी.शिंदे, के.डी.गांगुर्डे, एस.डी.पाटोळे, आर.एस.ढोली,ए.बी.थोरे उपस्थित होते.