शिवसेना सदस्य नोंदणीला उदंड प्रतिसाद : शिवसेनाप्रमुख औताडे

0

मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेनी सर्वच घटकांना न्याय दिल्यामुळे कोपरगाव तालुक्यात हजारोंच्या संख्येने शिवसेना सदस्य नोंदणी 

कोपरगाव प्रतिनिधी : शिवसेना पक्षप्रमुख एकनाथराव शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना अडीच वर्ष मिळालेल्या कारकिर्दीत महाराष्ट्राच्या विकासाला दिशा दिली. त्यांच्या कामावर जनता खुश झाली. आजही उपमुख्यमंत्री म्हणून सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय ते घेत आहे. सर्वच घटकांसाठी त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळेच आज शिवसेना सदस्य नोंदणीला उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी सांगितले.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे वारसदार शिवसेना पक्षप्रमुख एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाची सदस्य नोंदणी महाराष्ट्रात 23 जानेवारीपासून सुरू झाली आहे. त्याच धर्तीवर कोपरगाव तालुक्यातही 3 एप्रिल पासून शिवसेनेचा रथ फिरत आहे. शहर व गावोगावी जाऊन शिवसेना सदस्य नोंदणी मोहीम राबवत आहे. हजुरांच्या संख्येने सदस्य नोंदणी झाली आहे.

शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब रहाणे, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख भगिरथ होन,शिवसेना तालुकाप्रमुख रावसाहेब थोरात, युवासेना प्रमुख अभिषेक आव्हाड, शिवसेना संघटक शिवाजी जाधव, अक्षय गुंजाळ, शिवसेना शहर प्रमुख अक्षय जाधव, सिताराम जावळे, प्रवीण शिंदे, रमेश ढवळे, सुनील साळुंके, अनिल नरोडे अदी शिवसेनेच्या कार्यकर्ते सदस्य नोंदणी जास्तीत जास्त करण्यासाठी प्रयत्न करत आहे. शिवसेना पक्षाला कोपरगाव तालुक्यात यामुळे पोषक वातावरण तयार झाले आहे. गावागावात जेव्हा सदस्य नोंदणीचा रथ जातो तेव्हा महिला भगिनी ,शेतकरी व युवक वर्ग मोठ्या संख्येने प्रतिसाद देत असून सदस्य नोंदणी मोहीम पुढील एक महिना सातत्याने राबवली जाणार असल्याचे औताडे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here