एस.एस.जी.एम. महाविद्यालयात जीवशास्त्र राष्ट्रीय ईपरिषद संपन्न

0

“जीवशास्त्र, जैवविविधता आणि संवर्धनातील प्रगती”

कोपरगाव प्रतिनिधी : श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स आणि संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव येथील वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र व IQAC विभागांतर्गत “Advances In Life Sciences, Biodiversity And Conservation” या विषयावर मंगळवार,दि.८ एप्रिल २०२५ रोजी आभासी आणि प्रत्यक्ष प्रणालीद्वारे राष्ट्रीय परिषदे राष्ट्रीय ई- परिषद संपन्न झाली. या परिषदेमध्ये प्रजाती नष्ट होण्याच्या धोका, पर्यावरणीय समतोल, संरक्षित क्षेत्रे, पवित्र उपवन आणि इतर जैवविविधता,जीवन विज्ञान,
जैवविविधता आणि संरक्षणातील प्रगती या विषयावर चर्चा करण्यात आली. सदर परिषदेमध्ये विविध राज्यांतील तज्ज्ञ, अभ्यासक, संशोधक आणि विद्यार्थी यांनी सहभाग घेतला.

या राष्ट्रीय ई- परिषदेचे प्रास्ताविक व उद्घाटनपर मनोगत प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी केले. त्यांनी आपल्या मनोगतात पाहुण्यांचे शब्दसुमनांनी स्वागत करून जीवन विज्ञान, जैवविविधता आणि संरक्षणातील प्रगती” या विषयावरील एकदिवसीय ई-कॉन्फरन्सचे उद्दिष्ट स्पष्ट करताना वरील क्षेत्रात नावीन्य आणण्यासाठी सहयोग आणि विचारांची देवाणघेवाण वाढवून प्रख्यात तज्ञांमार्फत जीवन विज्ञानातील नवीनतम प्रगती आणि ट्रेंड जाणून घेण्याची संधी सहभागींना मिळेल,असे स्पष्ट केले. राष्ट्रीय ई- परिषदेला शुभेच्छा देताना रयत शिक्षण संस्थेचे व्हा.चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे यांनी ए. आय. तंत्रज्ञानाद्वारे, “नैसर्गिक अधिवासांमध्ये जैवविविधतेचे संवर्धन हे पारिस्थितिक तंत्राची लवचिकता राखण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.” या विषयी मार्गदर्शन केले.

उद्घाटन सत्राचे प्रमुख पाहुणे डॉ. डी. के. म्हस्के कुलगुरू,कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा यांनी मार्गदर्शन पर मनोगतात, “जैवविविधता आणि संवर्धन,विविध विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रगती, जैवविविधतेतील गोष्टींबद्दल पारंपारिक दृष्टिकोन, जागतिक जैवविविधता, जीवन विज्ञानातील प्रगती,कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंगमधील प्रगती या विषयावर भाष्य केले. सदर परिषदेत डॉ. दीप्ती याकंदावाला, (प्रमुख,वनस्पतीशास्त्र विभाग,पेराडनिया विद्यापीठ, श्रीलंका)यांनी ‘जैव- भौगोलिक स्थिती,विविध टोपोग्राफी विविध हवामान क्षेत्रे,जीवन विज्ञान, जैवविविधता आणि संरक्षणातील प्रगती,प्रजातींच्या सीमा स्पष्ट करणे,संकरीकरण आणि जनुक प्रवाह,फिलोजेनेटिक संबंध,जैव-भौगोलिक नमुने समजून घेणे या घटकावर अभ्यासकांचे लक्ष केंद्रित केले.डॉ.एस.आर.यादव (‘इन्सा’चे मानद शास्त्रज्ञ वनस्पतीशास्त्र विभाग,शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर) यांनी,शैक्षणिक आणि संशोधन संस्थांची भूमिका व दस्तऐवजीकरण, संवर्धन आणि वनस्पती संसाधनांचे जैव-पूर्वेक्षण, औषधांची निर्मिती प्रामुख्याने वनस्पतींपासून, वनस्पतींचे सांस्कृतिक व धार्मिक महत्त्व,वनस्पती आणि मानवी जीवन यांच्यातील भावनिक आणि आध्यात्मिक संबंध याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. शक्तीकुमार सिंह,( शास्त्रज्ञ डी प्राणीशास्त्र विभाग, एम.ओ.ई.एफ.सी.सी, नवी दिल्ली) यांनी ” जैवविविधतेचे संकलन आणि जीवशास्त्राचे स्वरूप ” या विषयावर भाष्य केले. डॉ.पलट्टी अल्लेश सिनू, प्राणीशास्त्र विभाग (सायंटिस्ट-सी, केंद्रीय विद्यापीठ, केरळ ) यांनी “अन्नसुरक्षा, अन्न सुरक्षेसाठी वनस्पती- कीटक परागकण संवाद ” या विषयावर मार्गदर्शन केले.

तृतीय सत्रासाठी सिंधू महाविद्यालय नागपूर येथील प्राणी शास्त्र विभाग प्रमुख व सहयोगी प्राध्यापक डॉ. मिलिंद शीणखेडे यांनी अध्यक्षपद भूषविले. तर प्रा.आर.पी.दळवी यांनी सूत्रसंचालन केले. सदर ई परिषदेसाठी एकूण ३८ संशोधन लेख प्रकाशनासाठी प्राप्त झाले असून ५३ अभ्यासकांनी आपले संशोधन पर लेख सादर केले.
सदर परिषदेसाठी १९९ अभ्यासकांनी सहभाग नोंदवला.
राष्ट्रीय ई परिषदेच्या समारोप सत्रासाठी प्रमुख अतिथी लाभलेले प्राचार्य डॉ. सी. जे.खिलारे (शरदचंद्र पवार महाविद्यालय,लोणंद, सातारा) यांनी समारोपीय मनोगत व्यक्त करताना, “जैवविविधता, उत्पादन, आवश्यकता, देशाची जैवविविधता, जीवशास्त्र आणि संशोधन यामधील संशोधन प्रगती, जैवविविधता संवर्धनातील आव्हाने, समस्या, उपयोजना व तंत्रज्ञानातील प्रगती” या संकल्पना स्पष्ट केल्या. सदर परिषदेच्या यशस्वीतेसाठी वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा. हंसराज मते व प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. विलास जीवतोडे आणि दोन्ही विभागातील सहकारी प्राध्यापकांनी परिश्रम घेतले. परिषदेचा गोषवारा डॉ. निलेश मालपुरे यांनी मांडला व आभार प्रा. सोनाली गोसावी यांनी मानले. या परिषदेतील विविध सत्रांचे सूत्रसंचालन डॉ.संगीता दवंगे व प्रा. अंकिता प्रसाद यांनी केले. सदर परिषदेसाठी प्रा.डी.बी.वैराळ यांचे तंत्रसहाय्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here