[ad_1]
IPL 2025 : दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जाएंट्स (Delhi Capitals VS Lucknow Super Giants) यांच्यात झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) पराभव झाल्यावर त्यांच्यावर मॅच फिक्सिंगचे आरोप लागले होते. संघावर हे आरोप राजस्थान क्रिकेट एसोसिएशनच्या एड-हॉक कमेटीचे संयोजक जयदीप बिहानी यांनी लावले होते. मात्र या मॅच फिक्सिंगच्या आरोपानंतर राजस्थानने कठोर शब्दात याला उत्तर दिलं तसेच यावर आक्षेप सुद्धा घेतला. पण आता एका रिपोर्टनुसार समोर आले आहे की आरसीएने केलेल्या या आरोपांच्या मागचे कारण तिकीट विक्री सुद्धा असू शकते.
टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, आरसीएला आयपीएल 2025 दरम्यान सामान्य तिकिटं मिळाली आहेत, जे त्यांच्या नाराजीचं नेमकं कारण असू शकतं. रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, साधारणपणे प्रति सामना जवळपास 1,800 तिकिटं दिली जातात. परंतु 2025 याची संख्या खूप कमी केली गेली, ज्यामुळे त्यांना प्रति सामना केवळ 1,000 ते 1,200 तिकिटं देण्यात आली आहेत.
हेही वाचा : मॅच जिंकल्यावर केएल राहुलने संजय गोएंकांना केलं इग्नोर, पाहताच तोंड फिरवलं Video Viral
मीडिया रिपोर्टनुसार राजस्थान रॉयल्सच्या एका सूत्राने माहिती दिली की, ‘यंदा सीजनच्या सुरुवातीलाच बीसीसीआयने आम्हाला स्पष्ट निर्देश दिले होते की आता आरसीए रद्द झालं आहे त्यामुळे आम्ही सर्व व्यवस्थांसाठी राजस्थान राज्य खेल परिषद (RSSC) यांच्याशीच संपर्क करावा. राजस्थान रॉयल्सने यापूर्वीच बिहानी यांनी लावलेल्या आरोपांचे खंडन केले आहे. यासोबतच आता बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सुद्धा आरसीए विरुद्ध आवाज उठवला आहे. 2012 मध्ये राजस्थान रॉयल्सचा मॅच फिक्सिंग प्रकरणात सहभाग असल्याने त्यांच्यावर बीसीसीआयने दोन वर्षांच्या बंदीची कारवाई केली होती.
काय म्हणाले बीसीसीआयचे अधिकारी?
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले की, ‘आरसीए सध्या रद्द झालं आहे. एक एड-हॉक कमेटी बनवली गेली असून आता निवडणूक जवळ आल्याने असे ड्रामे केले जात आहेत. प्रत्येकजण आता आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतोय. बीसीसीआयकडे अँटी करप्शन यूनिट आहे जे चुकीच्या गोष्टी आयपीएल पासून दूर ठेवण्यासाठी 24 तास कर करतो. त्यामुळे राजस्थान रॉयल्सवर करण्यात आलेल्या आरोपांमध्ये कोणतीही सत्यता नाही.
राजस्थान रॉयल्स पॉईंट्स टेबल :
राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2025 मध्ये आतापर्यंत 8 सामने खेळले असून यापैकी फक्त 2 सामने जिंकण्यात त्यांना यश आलं आहे. त्यामुळे राजस्थानचा संघ सध्या पॉईंट्स टेबलमध्ये आठव्या स्थानी आहे. राजस्थानच्या खात्यात केवळ 4 पॉईंट्स असून त्यांचा नेट रनरेट हा – 0.633 इतका आहे.
[ad_2]