Who is Duplicate MS Dhoni in Arun Jaitley Stadium fans ignoring real mahi batting in IPL 2025 CSK vs RR Match | क्रिजवरही धोनी आणि प्रेक्षकांमध्येही धोनी… कोण आहे MS Dhoni चा हा डुप्लिकेट?

0

[ad_1]

Who Is Duplicate MS Dhoni At Arun Jaitley Stadium:  IPL 2025 च्या 62व्या सामन्यादरम्यान मंगळवारी एक भन्नाट प्रसंग पाहायला मिळाला. हा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्समध्ये खेळला जात होता. जे घडलं ते पाहून अनेकजण हैराण झाले होते. तर त्याच झालं असं की,चेन्नईच्या फलंदाजीदरम्यान स्टेडियममध्ये एक व्यक्ती धोनीसारखा हुबेहुब दिसत असल्याचं लक्षात आलं. हे बघून मैदानात खेळात असलेला खरा धोनी सोडून स्टँडमधले प्रेक्षक त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी धडपडू लागले. 

कोण आहे ‘डुप्लिकेट धोनी’?

डुप्लिकेट धोनी म्हणून ओळख मिळवलेला हा माणूस आहे ऋषभ मालाकार. ऋषभ हा सोशल मीडियावर आधीच लोकप्रिय आहे. चेहरा, दाढी आणि हेअरस्टाईलपासून ते हावभावांपर्यंत ऋषभ माहीसारखाच दिसतो. त्यामुळेच तो स्वतः एक इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर बनला आहे. सध्या त्याचे 90 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. सामना सुरू होण्याआधी ऋषभने इंस्टा स्टोरी टाकून सांगितलं होतं की तो दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये CSK विरुद्ध RR सामना पाहायला येणार आहे.

डुप्लिकेटवर चाहत्यांचा जीव जडला 

सामन्यात धोनी फलंदाजीसाठी मैदानात उतरला असतानाच स्टँडमध्ये ऋषभ मालाकार कॅमेऱ्याच्या नजरेत आला. प्रेक्षकांनी ते बघताच त्याला जणू माहीच समजून त्याच्याभोवती गर्दी केली. इतकंच नव्हे, तर अनेकांनी रिअल धोनीची फलंदाजी न बघता करत डुप्लिकेट माहीसोबत फोटो घेण्यातच रस दाखवला. 

 

 

सोशल मीडियावर हवा 

ऋषभ मालाकार सध्या जरी सोशल मीडियावर व्हायरल झाला असला, तरी माहीच्या चाहत्यांमध्ये तो एक चर्चेचा विषय ठरत आहे. पुढे तो केवळ डुप्लिकेट म्हणून ओळखला जाईल की स्वतःचं युनिक आयडेंटिटी तयार करेल हे वेळच ठरवेल. त्याचा स्टेडियममधला व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. 



[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here