Sunrisers Hyderabad plyer Travis Head Tests Positive For COVID-19, To Miss SRH vs LSG IPL 2025 Match | IPL 2025 मध्ये कोरोनाचा शिरकाव! ‘हा’ फलंदाज निघाला पॉझिटिव्ह, संघाचं वाढलं टेन्शन

0

[ad_1]

COVID 19: आयपीएल 2025च्या (IPL 2025) रंगतदार सिजनमध्ये एका धक्कादायक बातमी आली आहे. या बातमीमुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडवली आहे. सिजनच्यामधेच एक खेळाडूला कोरोनाची लागण झाली आहे. सनरायझर्स हैदराबादचा (SRH) प्रमुख फलंदाज ट्रॅव्हिस हेड (Travis Head) कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. सनरायझर्स हैदराबाद (SRH) चे मुख्य प्रशिक्षक डॅनियल व्हेटोरी यांनी ही एक खळबळजनक बातमी दिली आहे. त्यांनी सांगितले की हैदराबाद संघाचा स्टार फलंदाज ट्रॅव्हिस हेडची कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ट्रॅव्हिस हेड आयपीएल 2025 मध्ये कधी सामने खेळू शकेल याबद्दल अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

काय म्हणाला डॅनियल विटोरी? 

सनरायझर्स हैदराबाद (SRH) साठी ही खूप वाईट बातमी आहे. डॅनियल विटोरी म्हणाले, “ट्रॅव्हिसला कोविड झाला आहे आणि त्याच्या प्रकृतीनुसार आम्ही त्याची पुढील उपलब्धता ठरवू.” सनरायझर्स हैदराबाद संघ आयपीएल 2025 च्या प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडला आहे. आयपीएल 2025 च्या पॉइंट्स टेबलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघ आठव्या क्रमांकावर आहे. संघाने 11 सामन्यांपैकी फक्त 3 सामने जिंकले आहेत आणि 7 सामन्यांमध्ये पराभव झाला आहे. 

हे ही वाचा: रोहित शर्माच्या टॅलेंटला ओळखणारा क्रिकेटपटू काळाच्या पडद्याआड; सुनील गावस्करांचे जिवलग मित्र अन् मुंबईशी खास नातं…

 

ट्रॅव्हिस हेडनची खेळी 

ट्रॅव्हिस हेडने यंदाच्या आयपीएल 2025 सिजनमध्ये 10 डावांमध्ये 281 धावा केल्या असून त्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. ट्रॅव्हिस हेडचा सर्वोत्तम स्कोअर 67 धावा आहे. 

हे ही वाचा: “मी म्हटलं होतं एक दिवस खूप मारेल…” अर्शदीपची धुलाई, पण बेइज्जत झाला मोहम्मद रिझवान; Video Viral

 

हे ही वाचा: “आई मला रात्रभर…”, सायना नेहवालच्या यशामागे तिच्या आईची किती मेहनत आहे? स्वतः दिला आठवणींना उजाळा

 

दरम्यान, भारत-पाकिस्तान सीमावादामुळे आयपीएलमध्ये झालेल्या ब्रेकबद्दल बोलताना विटोरी म्हणाले, “ब्रेकमुळे काही संघ गती गमावतील, पण खेळाडूंनी तयार राहायला हवे. कोणतंही कारण चालणार नाही.”



[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here