Rohit Sharma stand in Wankhede stadium wife Ritika Sajdeh got emotional while inauguration video viral | वानखेडे स्टेडियममध्ये रोहित शर्माच्या नावे स्टँडचं उद्घाटन, पत्नी रितिका सजदेह झाली भावूक; Video Viral

0

[ad_1]

Rohit Sharma Wife ritika sajdeh emotional at Wankhede stadium: 16 मे रोजी मुंबईच्या प्रतिष्ठित वानखेडे स्टेडियममध्ये (wankhede stadium) एक ऐतिहासिक क्षण घडला. भारतीय क्रिकेट संघाचा वनडे कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नावाने स्टँडचं उद्घाटन करण्यात आलं. मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे आयोजित या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी, मुंबई क्रिकेट असोसिएशनने रोहित शर्मा, शरद पवार आणि माजी फलंदाज अजित वाडेकर यांच्या नावावर असलेल्या स्टँडचे अधिकृत करण्यात आले. यासोबतच वानखेडे स्टेडियममध्ये एका लाउंजचेही उद्घाटन करण्यात आले.

रोहितची पत्नी रितिका झाली भावूक 

या खास प्रसंगी रोहित शर्माचं कौतुक बघायला वानखेडे स्टेडियमवर त्याची पत्नी रितिका सजदेह, आई-वडील आणि कुटुंबातील इतर सदस्यही उपस्थित होते. स्वतःच्या नावाच्या स्टॅन्डच उद्घाटन रोहितला कुटुंबाच्या हस्ते करायचं होतं. तो खास स्टेजच्या खाली उतरून त्यांना घेऊन आला.  रोहितने आपल्या आई-वडिलांना पुढे करून त्यांच्या हस्ते स्टँडचे उद्घाटन करवले. हा क्षण अत्यंत भावनिक होता. रितिका सजदेह या क्षणी इतकी भावूक झाली की त्यांना अश्रू अनावर झाले. स्टेजवर काही वेळ ती रडताना दिसली. याचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

हे ही वाचा: ‘ही’ आहे खरी इन्साईड स्टोरी! निवृत्तीपूर्वी कोहलीने केली होती रवी शास्त्रींशी चर्चा, मोठा खुलासा

स्टॅन्डच उद्घाटन झाल्यावर काय म्हणाला रोहित?

स्टँडच्या उद्घाटनानंतर, रोहित शर्माने चाहत्यांसोबत त्याच्या मनातील भावना शेअर केल्या. रोहित म्हणाला की, “मी कधीच कल्पना केली नव्हती की वानखेडेसारख्या ऐतिहासिक मैदानावर माझ्या नावाने स्टँड असेल. मी इथे अनेक अविस्मरणीय क्षण घालवले आहेत. आज माझे आई-वडील, भाऊ आणि पत्नी इथे उपस्थित आहेत. त्यांच्या पाठिंब्याशिवाय मी हे काहीच करू शकलो नसतो.” 

हे ही वाचा: Imran Khan News: इम्रान खान यांची तुरुंगात हत्या? पाकिस्तान सरकारने काय म्हटलंय जाणून घ्या

रोहितने पुढे सांगितलं की, “मुंबई इंडियन्सचे सामने आणि सरावसत्रे हे याच मैदानावर होतात. त्यामुळे हा स्टँड माझ्यासाठी अधिक जवळचा आणि खास आहे.”

हे ही वाचा: नीरज चोप्राने अर्शद नदीमबद्दल केलं धक्कादायक विधान, म्हणाला- ‘आम्ही कधीही…’

रोहितच्या नेतृत्वाखाली जिंकला वर्ल्ड कप 2024

गेल्या काही वर्षांत रोहित शर्माने भारतीय संघाला अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये यश मिळवून दिलं आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने टी20 वर्ल्ड कप 2024 आणि चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकली आहे. रोहितने सध्या टी20 आणि टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून तो फक्त वनडे फॉर्मेटमध्ये खेळत आहे.



[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here