[ad_1]
Neeraj Chopra on Arshad Nadeem: भारतातील स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि पाकिस्तानच्या अरशद नदीम यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. यावेळी कारण आहे, भारतीय भालाफेकपटू आणि दोन वेळचे ऑलिम्पिक पदकविजेता नीरज चोप्रा यांनी पाकिस्तानच्या अरशद नदीमविषयी एक स्पष्ट आणि ठाम विधान दिलं आहे. डायमंड लीग स्पर्धेच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत नीरजने स्पष्ट सांगितलं की, “मी आणि अरशद नदीम कधीच जवळचे मित्र नव्हतो. आमचं नातं केवळ खेळापुरतं मर्यादित होतं.”
स्पर्धेसाठी आमंत्रण…
एप्रिल 2025 मध्ये जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये (Pahalgam attack) झालेल्या दहशतवादी (terrorist attack on jammu and kashmir) हल्ल्यात 26 नागरिकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी सोशल मीडियावर नीरज चोप्रा यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर जोरदार टीका झाली. याचे कारण ठरले त्याने पाकिस्तानच्या अरशद नदीमला बेंगळुरूतील ‘एनसी क्लासिक’ स्पर्धेसाठी दिलेलं आमंत्रण. नंतर ही स्पर्धा स्थगित करण्यात आली.
हे ही वाचा: ‘ही’ आहे खरी इन्साईड स्टोरी! निवृत्तीपूर्वी कोहलीने केली होती रवी शास्त्रींशी चर्चा, मोठा खुलासा
नक्की काय म्हणाला नीरज?
प्रेस कॉन्फरन्समध्ये नीरज चोप्रा म्हणाला की, “सर्वप्रथम मी हे स्पष्ट करू इच्छितो की माझे (नदीमशी) फारशी घट्ट मैत्री नाही. आम्ही कधीच जवळचे मित्र नव्हतो. पण यामुळे (भारत-पाकिस्तान सीमेवरील तणाव) आपल्यातील चर्चा पूर्वीसारखी होणार नाही. पण जर कोणी माझ्याशी आदराने बोलले तर मीही त्याच्याशी आदराने बोलतो. तो म्हणाला, “खेळाडू म्हणून आपल्याला बोलत राहावे लागते. जगभरातील क्रीडा जगतात माझे काही चांगले मित्र आहेत, फक्त भालाफेकमध्येच नाही तर इतर खेळांमध्येही. जर कोणी माझ्याशी आदराने बोलले तर मीही त्याच्याशी पूर्ण आदराने बोलेन.”
नीरज पुढे म्हणाला की, “भालाफेक हा लहानसा समुदाय आहे आणि सर्वजण आपल्या देशासाठी सर्वश्रेष्ठ देण्याचा प्रयत्न करतात.”
हे ही वाचा: अहमदाबादमध्ये पाळीव रॉटवीलरच्या हल्ल्यात चार महिन्यांच्या बाळाचा मृत्यू, धक्कदायक घटना कॅमेऱ्यात कैद, Video
ईमानदारीवर झालेल्या टीकेमुळे दुख
नीरजने सांगितलं की, त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या ईमानदारीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या सोशल मीडिया पोस्टमुळे त्यांना मानसिक त्रास झाला. त्याने स्पष्ट केलं की नदीमला आमंत्रण हे हल्ल्याच्या एक दिवस आधी पाठवले गेले होते.
हे ही वाचा: Imran Khan News: इम्रान खान यांची तुरुंगात हत्या? पाकिस्तान सरकारने काय म्हटलंय जाणून घ्या
नीरज विरुद्ध नदीम…
- नीरज चोप्रा – टोकियो 2021 मध्ये सुवर्ण, पॅरिस 2024 मध्ये रौप्य
- अरशद नदीम – पॅरिस 2024 मध्ये सुवर्ण विजेता
- दोघांनी जागतिक स्तरावर एकमेकांशी अनेक वेळा स्पर्धा केली आहे.
[ad_2]