[ad_1]
IPL 2025 : आयपीएल 2025 ही स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यावर पोहोचली आहे. मंगळवार 27 मे रोजी शेवटचा लीग स्टेज सामना खेळवला जाणार असून त्यानंतर गुरुवार पासून लीग स्टेज सामने खेळवले जातील. 29 मे रोजी क्वालिफायर 1 हा प्लेऑफचा पहिला सामना खेळवला जाईल. तर एलिमिनेटर सामना 30 मे, क्वालिफायर 2 सामना 1 जून रोजी खेळवण्यात येईल. तर फायनल सामना 3 जून रोजी पारपडेल. भारतातील विविध राज्यांमध्ये मान्सून वेळेआधीच दाखल झाल्यामुळे अनेक ठिकाणी पावसाची संततधार सुरु झाली आहे. त्यामुळे समजा क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामन्यात पावसाने खोडा घातला आणि सामना रद्द करण्याची वेळ आली तर कोणता संघ फायनलला जाणार याबाबतच समीकरण आणि बीसीसीआयचे नियम जाणून घेऊयात.
पंजाबमध्ये होणार क्वालिफायर 1 आणि एलिमिनेटर सामने :
आयपीएल 2024 च्या प्लेऑफमध्ये गुजरात टायटन्स, पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स या 4 संघांनी क्वालिफाय केलं आहे. यातील पंजाब किंग्सने टॉप 2 मध्ये स्थान निश्चित केलं असून मुंबई इंडियन्स चौथ्या स्थानावर क्वालिफाय झाला आहे. तर गुजरात टायटन्स आणि आरसीबी हे संघ कोणत्या नंबरवर लीग स्टेज फिनिश करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. क्वालिफायर 1 आणि एलिमिनेटर सामना पंजाबच्या महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत.
प्लेऑफ सामन्यात पावसाची शक्यता :
आयपीएल 2025 च्या पूर्वच्या वेळापत्रकानुसार कोलकाता आणि हैदराबाद प्लेऑफ सामने होणार होते. मात्र पावसाची शक्यता जास्त असल्याने बीसीसीआयने पंजाबच्या महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर क्वालिफायर 1 आणि एलिमिनेटर सामने खेळवायचे ठरवले. तर फायनल आणि क्वालिफायर 2 सामना हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होईल. हवामान खात्याच्या माहितीनुसार हरियाणा, पंजाब आणि चंडीगढ़ येथे वादळवाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा : ‘KKR ला लाज वाटली पाहिजे, साधा एक…’; IPL ट्रॉफीच्या ‘त्या’ पोस्टवरुन SRK च्या टीमवर चाहत्यांचा संताप
क्वालिफायर आणि एलिमिनेटर पावसामुळे रद्द झाला तर?
आयपीएल मध्ये क्वालिफायर 1 आणि एलिमिनेटर सामना आतापर्यंत पावसामुळे रद्द करण्याची वेळ आलेली नाही. परंतु पंजाबच्या स्टेडियमवरील दोन्ही प्लेऑफ सामने पावसामुळे होऊ शकले नाहीत तर काय असा प्रश्न आहे. तुम्हाला सांगू इच्छितो की, क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामन्यासाठी रिजर्व डे ठेवण्यात आलेला नाही. प्लेऑफ सामन्यात पावसाचा व्यत्यय आला तर त्यासाठी अतिरिक्त दोन तास दिले जातील. जर पावसाच्या व्यत्ययामुळे सामन्यात एकही बॉल न टाकता रद्द करण्यात आला तर ग्रुप राउंडमध्ये वरच्या स्थानावर असलेला संघ पुढच्या राउंडसाठी क्वालिफाय करेल. म्हणजेच पहिल्या क्रमांकावर असणारा संघ क्वालिफायर-1 चा विजेता मानला जाईल, तर दुसऱ्या क्रमांकाचा संघ हा क्वालिफायर 2 चा सामना खेळेल. तर असंच काहीसं एलिमिनेटर सामन्यात सुद्धा होईल. मुंबई इंडियन्स चौथ्या क्रमांकावर आहे. जर पावसामुळे सामना रद्द झाला तर मुंबईचा संघ स्पर्धेतून बाहेर होईल आणि तिसऱ्या क्रमांकाचा संघ क्वालिफायर 2 सामना खेळेल.
फायनल सामन्यासाठी रिझर्व्ह डे :
क्वालिफायर 1 आणि एलिमिनिटर सामन्याप्रमाणे जर अहमदाबादमध्ये होणारा क्वालिफायर २ सामना सुद्धा पावसामुळे रद्द झाला तर पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहणारा संघ हा फायनलसाठी क्वालिफाय होईल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनल सामना होणार असून या सामन्यासाठी रिझर्व्ह डे ठेवण्यात आला आहे. त्यामुळे 3 जून रोजी सामना झाला नाही तर दुसऱ्या दिवशी सामना खेळवला जाईल.
[ad_2]