मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची शिक्षण आयुक्तांसोबत बैठक संपन्न 

0
IMG-20250528-WA0045.jpg

पुणे प्रतिनिधी : अखिल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची  सचिन्द्र प्रताप सिंह शिक्षण आयुक्त , (भा.प्र.से ) महाराष्ट्र राज्य पुणे आयुक्तालय येथे बैठक संपन्न. झाली .

या बैठकीमध्ये संच मान्यता निकष व 11 वी ऑनलाईन प्रवेशा बाबत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली . शिक्षण आयुक्तांनी सदर मुद्द्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले . या वेळी मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे सचिव व पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस बी देशमुख हे ३१ में २०२५ रोजी आपल्या ३२ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत असल्याने त्यांचा शिक्षण आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी खास पुस्तक देवुन सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व आपण शिक्षण क्षेत्रातील दिलेल्या योगदानाबद्दल कौतुक करून आपले काम असेच पुढे अखंड चालु ठेवा असेही सांगितले.

याप्रसंगी मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष के.एस. ढोमसे, मार्गदर्शक वसंत पाटील, सचिव अशोक मोरे, उपाध्यक्ष प्रकाश देशमुख, सचिव एस.बी. देशमुख मराठवाडा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संजय शिप्परकर हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here