नीतिमूल्य जपले तर जनमानसात नाव कोरले जाते..कवी गोरक्षनाथ पवार
सौ सविता जावळे आदर्श समाजसेविका पुरस्काराने सन्मानित
कोपरगाव प्रतिनिधी : जीवनात अनेक चढउताराचे प्रसंग असतात. पैसा येतो पैसा जातो. मात्र प्राणिमिकपणा व नीतिमूल्य जपले तर जनमानसात नाव कोरले जाते असे प्रतिपादन चमकणारे दिवे पुस्तकाचे लेखक कवी गोरक्षनाथ पवार यांनी केले. ते मुंबई येथे मेयर हॉल , अंधेरी पश्चिम मुंबई येथे सौ सविता लक्ष्मण जावळे यांचा सत्कार करताना बोलत होते. सौ सविता जावळे यांनी केलेल्या समाजसेवेच्या कामाची दखल घेत त्यांना आदर्श समाजसेविका पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
चमकणारे दिवे पुस्तकात महाराष्ट्रातील १४ समाजसेवक समाजसेविका यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकलेला आहे.यात सौ सविता जावळे यांच्याही कामाचा उल्लेख करण्यात आला आहे. चमकणारे दिवे पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन ज्येष्ठ पत्रकार अमोल भालेराव यांनी केले होते.यावेळी सिने अभिनेता विजय पाटकर, रेडिओ जॉकी जगदीश संसारे, धर्मा जावळे, श्रीमती शशी दिप, पांडुरंग कुलकर्णी, जगदीश संसारे, साहित्यिका आशाताई ब्राह्मणे, ख रं माळवे, मिलिंद पगारे, सुधीर नागले,गिताश्री नाईक, बाळासाहेब माकोणे, निखिल जावळे, ऋषिकेश जावळे, अश्विनी जावळे, देवयानी जावळे, लक्ष्मण जावळे अदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार आशाताई ब्राह्मणे यांनी मानले.