[ad_1]
IND VS ENG Test : भारताचा टेस्ट क्रिकेट संघ जून महिन्यात टेस्ट सिरीज खेळण्यासाठी इंग्लंड दौरा करणार असून यात ते इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळणार आहेत. विराट कोहली आणि रोहित शर्माने या टेस्ट सीरिजपूर्वीच टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर आता वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचं (Jasprit Bumrah) एक आश्चर्यचकीत करणार विधान समोर येत आहे. बीसीसीआयने इंग्लंड दौऱ्यासाठी 18 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. हा संघ शुभमन गिलच्या (Shubman Gill) नेतृत्वात इंग्लंडचा सामना करेल.
जसप्रीत बुमराह सुद्धा घेणार निवृत्ती :
जगातील सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आपल्या निवृत्तीच्या नियोजनाविषयी खुलासा केला आहे. बुमराहने माजी खेळाडू माइकल क्लार्क यूट्यूब पॉडकास्ट शो बेयॉन्ड 23 मध्ये सांगितले की, जेव्हा त्याचं शरीर योग्यप्रकारे क्रिकेट खेळू शकणार नाही, त्यावेळी तो निवृत्तीची घोषणा करेल. बुमराहने सांगितले की कोणत्याही खेळाडूसाठी अधिक काळ क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये खेळणं अवघड आहे. बुमराह पुढे म्हणाला, ‘मी हे बऱ्याच काळापासून करत आहे, पण एक वेळ अशी येईल जेव्हा तुम्हाला समजून घ्यावे लागेल की तुमचं शरीर कुठे जातय’.
कोणती स्पर्धा महत्वाची हे ठरवा :
जसप्रीत बुमराहने पुढे म्हटले की, ‘कोणती स्पर्धा खेळणे जास्त महत्त्वाचे आहे हे तुम्ही तुमच्या शरीराचा विचार करून ठरवले पाहिजे. खेळाडूला त्याच्या शरीराचा वापर करताना थोडे अधिक समजूतदार असण्याची गरज आहे’. बुमराह पुढे म्हणाला, ‘मला क्रिकेटपटू म्हणून माझ्या कारकिर्दीत काहीही सोडायचं नाही आणि नेहमीच पुढे जायचं आहे’.
हेही वाचा : IPL 2025 Qualifier 2 : पावसामुळे मुंबई विरुद्ध पंजाब मॅच रद्द झाली तर कोणता संघ जाणार फायनलला? जाणून घ्या नियम
जसप्रीत बुमराह इंग्लंड दौऱ्यातील सर्व सामने खेळणार नाही?
भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah)हा इंग्लंड दौऱ्यावरील सर्व 5 सामने खेळणं अवघड आहे. चीफ सिलेक्टर अजित आगरकरने भारतीय संघाची घोषणा करताना बुमराहच्या उपलब्धतेबाबत भाष्य केले. अजित आगरकर यांनी भारतीय संघाची घोषणा करताना सांगितले की, ‘कामाचे व्यवस्थापन लक्षात घेता, बुमराहला सर्व सामन्यांमध्ये खेळणे कठीण आहे. आगरकर म्हणाले की, ‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे फिजिओ आणि डॉक्टरांशी सल्लामसलत केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे’.
आगरकर म्हणाले की, ‘फिजिओ आणि डॉक्टरांनी ज्या प्रकारे आम्हाला सांगितलं आहे, मला असं वाटत नाही की बुमराह पाचही सामन्यांमध्ये उपलब्ध होऊ शकेल. तो तीन किंवा चार किती सामने खेळेल याचा निर्णय सीरिज कशी चालू आहे आणि त्याचे शरीर किती काम करण्यास सक्षम आहे यावर अवलंबून असेल. बुमराह आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. जर तो तीन किंवा चार टेस्टसामन्यांसाठी फिट असेल तर तो आपल्या गोलंदाजीनं आम्हाला टेस्ट सामना जिंकवू शकतो’.
[ad_2]