पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन
“पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर “पुरस्काराने महिलांचा सन्मान
येवला प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती निमित्त अंदरसुल ग्रामपंचायत सभागृहात अभिवादन करण्यात आले यावेळी सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन आपला ग्रामपंचायत स्तरीय “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने प्रातिनिधिक महिलांचा सन्मान करण्यात आला प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रतिमेचे पुजन करण्यात आले यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रकाश साबरे, ग्रामपंचायत सदस्य योगेश जहागीरदार,झुंजार देशमुख, युवानेते महेश देशमुख,राजेंद्र सुरासे,बाळासाहेब गुंजाळ यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावर मनोगत व्यक्त केले दरम्यान सामाजिक क्षेत्रात केलेल्या समाज कार्याबद्दल महिला बचत गट अध्यक्षा अर्चना सैंद्रे,जिल्हा परिषद शिक्षिका योगिता पैठणकर,आशासेविका रेहाना ईनामदार
यांचा “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान करण्यात आला याप्रसंगी सरपंच लताबाई जानराव, माजी सभापती किसनराव धनगे, मकरंद सोनवणे,भागीनाथ थोरात,उपसरपंच रविंद्र वाकचौरे,ग्रा.पं.सदस्य योगेश जहागीरदार, झुंजार देशमुख,अमोल सोनवणे,एकनाथ सोनवणे, महेश देशमुख,गुलाब जानराव,दिपक सैंद्रे, राजु सुरासे ,भानुदास ढेपले आदींसह समाजबांधव उपस्थित होते