mukesh kumar wear 18 number jersey after virat kohli retired from test cricket

0

[ad_1]

IND VS ENG : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) 12 मे रोजी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यापूर्वी त्याने 2024 मध्ये टी 20 क्रिकेटमधून सुद्धा निवृत्ती घेतली होती, मात्र असं असलं तरी वनडे क्रिकेटमध्ये तो खेळताना दिसणार आहे. विराट कोहलीने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्याला एक महिना सुद्धा पूर्ण झाला नसताना टीम इंडियाच्या एका खेळाडूने 18 नंबरची टेस्ट जर्सी घालून खेळण्यास सुरुवात केली आहे. सध्या त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून फॅन्स याबाबत नाराजी व्यक्त करतायत. 

भारतीय टेस्ट संघ जून महिन्यात इंग्लंड दौरा करणार असून 20 जून पासून भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जाणार आहे. माजी कर्णधार रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ ही सीरिज खेळणार असून यासाठी संघाची घोषणा सुद्धा करण्यात आली आहे. 20 जून पासून इंग्लंड विरुद्ध टेस्ट सीरिजला सुरुवात होईल, मात्र त्यापूर्वी भारत ए विरुद्ध इंग्लंड ए यांच्यात एक अनौपचारिक टेस्ट सामना खेळवला जात आहे. 

भारत ए विरुद्ध इंग्लंड ए यांच्यातील या टेस्ट सामन्यात भारताचा गोलंदाज मुकेश कुमार हा विराट कोहली घालत असलेली 18 नंबरची टेस्ट जर्सी घालून खेळताना दिसला. यापूर्वी मुकेश कुमार हा टेस्ट क्रिकेट खेळताना 49 नंबरची जर्सी घालून खेळायचा. मात्र विराट निवृत्त होताच त्याने आपल्या टेस्ट जर्सीवर 18 नंबर लिहून ती घालण्यास सुरुवात केली. सध्या त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून फॅन्स कडून यावर नाराजी व्यक्त होतं आहे. ज्या प्रकारे भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याचा 10 जर्सी नंबर हा आता निवृत्त करण्यात आला, त्यानुसार विराटचा 18 जर्सी नंबर सुद्धा निवृत्त करण्यात यावा आणि त्या नंबरची जर्सी घालण्यास कोणत्याही इतर खेळाडूला परवानगी देऊ नये अशी मागणी फॅन्सकडून केली जातेय. 

विराट कोहलीने जवळपास 14 वर्ष टेस्ट क्रिकेटमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. तो भारताच्या टेस्ट संघाचा कर्णधार सुद्धा होता. त्याने टेस्ट क्रिकेटमध्ये 9230 धावा, 31 अर्धशतक, 30 शतक आणि 7 द्विशतक केली आहेत. 



[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here