चक्कर येवून पडल्याने डोक्याला जबर मार लागल्याने मृत्यू
देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
राहुरी फॅक्टरी येथील नगर मनमाड महामार्गालगत असलेल्या हॉटेल जयश्री येथिल हॉटेल कामगार भाऊसाहेब मुरलीधर पुंड हॉटेल मध्ये काम करीत असताना चक्कर येऊन खाली पडल्याने डोक्याला जबर मार लागल्याने उपचारापूर्वीच मयत झाल्याची घटना आज सोमवारी राहुरी फॅक्टरी येथील घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,देवळाली प्रवरा येथील रहिवासी भाऊसाहेब मुरलीधर पुंड वय ६५ वर्षे हे राहुरी फॅक्टरी येथील हॉटेल जयश्री मध्ये वेटर काम करत होते.आज सकाळी साडे नऊ वाजेचा दरम्यान मयत भाऊसाहेब पुंड हे हाँटेल माध्ये काम करीत असताना अचानक चक्कर आल्याने ते जमिनीवर कोसळले जमिनीवर कोसळल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले.घटनास्थळी तातडीने रुग्णवाहिका चालक पप्पू कांबळे यांनी धाव घेऊन त्यांना राहुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.मात्र वैद्यकीय सूत्रांनी उपचारापुर्वी मृत म्हणून घोषित केले.
मयत भाऊसाहेब पुंड यांच्या पश्चात पत्नी,मुलगा मुलगी असा परिवार असून दरम्यान याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात आकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.