सिन्नर प्रतिनिधी : पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी एस. बी. देशमुख हे आपल्या ३२ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहे. सेवापूर्ती समारंभ आयोजित करण्यात आला होता . त्यांचा निवृत्तीनंतर च्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिक्षक आमदार किशोर दराडे, माजी शिक्षक आमदार नानासाहेब बोरस्ते, माजी शिक्षण उपसंचालक डी.जी. जगताप,माजी शिक्षणधिकारी नवनाथ औताडे ,व्ही एन नाईक संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड,सगर शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी नामदेव लोणारे,माजी अध्यक्ष चंद्रकांत वरंदळ,राज्य महामंडळाचे अध्यक्ष केरूभाऊ ढोमसे,डॉ . उमेश येवलेकर,तहसीलदार सुरेंद्र देशमुख,उदयभाऊ सांगळे, के. के. अहिरे,सावंत एस के ,डॉ . दत्तात्रय दरंदले चंद्रभान रेवगडे , उपस्थित होते .
पाडळी सारख्या ग्रामीण भागातील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात आपल्या सेवेची सुरुवात करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा व आपल्या मुख्याध्यापक कारकिर्दीत विद्यार्थी हिताच्या अनेक उपक्रमांची सांगड घालून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला. यासाठी शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या मदतीचा उपयोग आपल्या सेवाकाळात त्यांनी करून घेतला. आपल्या सेवाकाळात विविध कंपन्यांच्या सी एस. आर निधीतून अनेक शालेय भौतिक बाबींची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला. अनेक संघटनांचे पदाधिकारी म्हणून काम करत असताना शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचा मदतीचा ओघ आपल्याकडे वळवून आपल्या विद्यालयाचा विकास साधण्याचा प्रयत्न केला. .
.संस्थेवर काम करत असताना राज्य महामंडळाचे पदाधिकारी म्हणून काम करताना आपल्या कामाची लकब व जिव्हाळ्याचे प्रश्न सोडवून घेण्याची खुबी असणारे व एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करून ती मिळवून घेणे असा स्वभाव असणारे असे राज्य महामंडळाचे अध्यक्ष केरुभाऊ ढोमसे यांनी गौरविले..
पारिजात हॉस्पिटलचे संचालक डॉ. उमेश येवलेकर यांनी मी माझी रुग्णसेवा देताना एखादा रुग्ण आपल्याकडे येऊन मला बरं करा अशी याचना करणारा रुग्ण मी बघितला . परंतु माझ्या हॉस्पिटलच्या दारात वारंवार येऊन माझ्या शाळेच्या, संस्थेच्या साठी काही करू शकता असे बिंबवणारे देशमुख सर मला भावून गेले.कामकाजाच्या आपल्या आरोग्याची काळजी घेणारे ते योगगुरू म्हणून ज्यांची दिनचर्या सातत्याने पहाटे सुरू होऊन रात्री केव्हा संपेल हे न समजणारे शालेय विद्यार्थ्यांना स्वतःच्या कृतीतून योगाचे धडे दिले. आरोग्याची काळजी व अभ्यासाची कास या बाबी विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवल्या. सर्वांना आपल्या सोबत घेऊन जाणारे व आपले ध्येय गाठणारे, कृतीतून ध्येय पुर्ती केली.
यावेळी नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सर्व पदाधिकारी, सिन्नर तालुका मुख्याध्यापक संघाचे सर्व पदाधिकारी, तालुक्यातील मुख्याध्यापक, शिक्षक, नातेवाईक व सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.