IPL संपताच भारताच्या स्टार खेळाडूचा साखरपुडा, कुलदीप यादवचे होणाऱ्या पत्नीसोबतचे Photo व्हायरल, कोण आहे होणारी बायको?

0

[ad_1]

Kuleep Yadav Engagement: भारतीय क्रिकेटर कुलदीप यादवचा साखरपुडा पार पडला आहे. लखनऊत त्याच्या साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात रिंकू सिंहसह अनेक क्रिकेटर्सही सहभागी झाले होते. कुलदीप यादवने आपली लहानपणीची मैत्रीण वंशिकाशी साखरपुडा केला आहे. वंशिका कानपूरची राहणारी असून, तिचे वडील एलआयसीत काम करतात. वंशिकासह कुलदीप यादवने आपल्या आयुष्यातील नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. 

कुलदीप यादव मूळचा उत्तर प्रदेशच्या उन्नावचा आहे. आपल्या कौशल्याच्या आधारे त्याने क्रिकेटमध्ये नाव कमावलं आहे. कुलदीप यादव एक उत्तम फिरकी गोलंदाज असून, अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावे केले आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करत कुलदीप यादवने नाव कमावलं आहे. आता त्याच्याकडे अनेक गाड्या आणि आलिशान घर आहे. 

इंग्लंड दौऱ्यावर जाणार कुलदीप

कुलदीप यादव आयपीएलमध्ये दिल्ली संघाकडून खेळत होता. सध्या तो कोणत्याही स्पर्धेत व्यग्र नाही. दरम्यान इंग्लंड दौऱ्यातील भारतीय संघात तो सहभागी असणार आहे. 20 जूनला भारतीय संघ इंग्लंडविरोधातील 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. संघातील अनुभवी खेळाडूंमध्ये कुलदीप यादवदेखील असेल. 

रिंकू सिंहदेखील करणार आहे नव्या आयुष्याची सुरुवात

भारताचा स्टार क्रिकेटपटू रिंकू सिंह आणि सपा खासदार प्रिया सरोज यांचाही साखरपुडा होणार आहे. त्यांच्या साखरपुड्याची आणि लग्नाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यांचा साखरपुडा 8 जून रोजी लखनौमध्ये होणार आहे आणि लग्न या वर्षी 18 नोव्हेंबर रोजी वाराणसीतील हॉटेल ताजमध्ये होणार आहे. रिंकू सिंहची होणारी पत्नी प्रिया सरोजचे वडील तूफानी सरोज सपा आमदार आहेत. प्रिया सरोज उत्तर प्रदेशातील मच्छलीशहर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत.



[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here