‘तो शॉट म्हणजे गुन्हा; त्याला माफी नाही’, IPL मध्ये पंजाब टीम हरल्यानंतर श्रेयश अय्यरवर कोण भडकलं?

0

[ad_1]

Shreyash Ayyar Wrong Shot: माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगचे वडील योगराज सिंग टीम इंडिय आणि प्लेयर्सबद्दल खुलेपणाने बोलत असतात. त्यांच्या या स्पष्ट बोलण्याच्या सवयीमुळे अनेकदा त्यांनी वादही ओढावून घेतले आहेत. आता त्यांनी नुकत्याच झालेल्या आयपीएल फायनलवर भाष्य केलंय. यावेळी श्रेयश अय्यर त्यांच्या निशाण्यावर आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि पंजाब किंग्ज इलेव्हन यांच्यात आयपीएल 2025 ची फायनल खेळली गेली. दोन्ही टीम्स पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफीसाठी भिडत होत्या. त्यामुळे दोन्ही टीम्ससाठी ही फायनल प्रतिष्ठेची होती. यात रॉयल चॅलेंजर्सने ट्रॉफी आपल्या नावावर केली. श्रेयस अय्यरने अंतिम सामन्यात खेळलेल्या डावावर योगीराज सिंह यांनी निशाणा साधलाय. त्यांनी आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) विरुद्ध पंजाब किंग्ज (पीबीकेएस) चा कर्णधार श्रेयस अय्यरचा शॉट आळशी असल्याचे म्हटलंय. अंतिम सामन्यात अय्यर 2 चेंडूत 1 धाव घेऊन बाद झाला होता.

पंजाब किंग्जच्या कर्णधाराने एका महत्त्वाच्या क्षणी आपली विकेट गमावली, ज्यामुळे आरसीबीला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी मिळाली. श्रेयस बाद झाल्यानंतर पंजाब संघावर दबाव आला. आता योगराज सिंग यांनी अय्यरवर निशाणा साधलाय. विशेषतः, त्याने त्याचा शॉट खराब खेळल्याचे त्यांनी म्हटलंय. या प्रकाराला योगीराज यांनी गुन्हा असं म्हटलंय. या संदर्भात त्याला कोणती माफी नाही, असेही ते पुढे म्हणाले. 

श्रेयसचा अपराधी शॉट

श्रेयस अय्यरने अंतिम सामन्यात खेळलेला फटका माझ्या मते गुन्हा होता. अशोक मंकडने मला याबद्दल सांगितले. यामुळे तुम्हाला दोन सामन्यांसाठी बंदी घातली जाऊ शकते. श्रेयसने जे केले ते स्वीकारार्ह नाही. यासाठी कोणतीही माफी नाही.

हा अंतिम सामना होता

अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या आरसीबीने 20 षटकांत 9 बाद 190 धावांचा डोंगर उभारला. ज्यामध्ये विराट कोहलीने 43 धावांचे योगदान दिले. जितेश शर्माने 10 चेंडूत 24 धावांची जलद खेळी केली. पंजाबकडून अर्शदीप सिंग (3/40) आणि काइल जेमिसन (3/48) यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबचा डाव डळमळला. जोश इंग्लिस 39 आणि शशांक सिंग नाबाद 61 धावा वगळता इतर कोणताही फलंदाज दीर्घ खेळी खेळू शकला नाही.



[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here