[ad_1]
विराट कोहलीची (Virat Kohli) आयपीएल स्पर्धा जिंकण्याची प्रतिक्षा अखेर 18 वर्षांनी संपली. आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात बंगळुरुने पंजाबचा (Punjab) 6 धावांनी पराभव केला. आयपीएल जिंकताच विराट कोहलीला अश्रू अनावर झाले होते. पंजाबचा प्रशिक्षक रिकी पाँटिंगने त्यावर भाष्य केलं आहे. 18 हंगामांपर्यंत आयपीएलच्या ट्रॉफीचा पाठलाग करताना त्याला किती भावनिक आणि वैयक्तिक त्रास सहन करावा लागला आणि खेळाडूंसाठी त्याचे किती महत्त्व आहे, याचा पुरावा कोहलीचे अश्रू होते असं रिकी पाँटिंग म्हणाला आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर झालेल्या सामन्यात बंगळुरुने आयपीएलचं पहिलं जेतेपद पटकावलं. अखेरच्या ओव्हरमध्ये सामना जिंकणार असल्याचं लक्षात येताच विराटच्या डोळ्यातून पाणी येण्यास सुरुवात झाली होती. सामना जिंकल्यानंतर खाली गुडघ्यावर बसून तो रडत होता. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याचा संपूर्ण प्रवास या एका फोटोतून दिसत होता. आयपीएलमध्ये 2008 पासून एकाच संघाकडून खेळणारा विराट कोहली एकमेव खेळाडू आहे.
“शेवटच्या षटकात त्याच्या डोळ्यातून अश्रू ढळत असल्याचं तुम्ही पाहू शकता. खेळाडूंसाठी हेच महत्त्वाचं आहे, प्रत्येकासाठी हेच महत्त्वाचे आहे,” असं पाँटिंगने अंतिम सामन्यानंतर पत्रकारांना सांगितलं.
“चेन्नईने काही वेळा आयपीएल जिंकली आहे, मुंबईने काही वेळा ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. आहे, परंतु ही स्पर्धा जिंकणं सोपं नाही. हे इतकं सोपं आहे. आणि तुम्हाला त्याबद्दल बराच वेळ आणि कठोर विचार करावा लागेल. ही ट्रॉफी जिंकणं सोपं नाही,” असं रिकी पाँटिंग म्हणाला आहे. मी प्रशिक्षक असो किंवा समालोचन करत असो, माझं पहिले प्रेम कसोटी क्रिकेट आहे आणि नेहमीच राहील असंही ते म्हणाला.
[ad_2]