राहुरी फँक्टरी परिसरात पुन्हा दोन दुकाने फोडली.

0

चोऱ्यांचा तपास लावण्यात पोलिस अपयशी;तीन व्यापारी संघटना भुमिका मात्र अस्पष्ट 

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी 

           नगर मनमाड महामार्गावरील राहुरी फँक्टरी परीसरात चोऱ्यांचे सत्र सुरुच असून पोलिसांना आव्हान देत अज्ञात चोरट्यांनी एका मागे एक दुकाने फोडण्याचा सपाटा लावला असून पोलिस मात्र हाताची घडी तोंडावर बोट ठेवून स्वतः ची निषक्रीयता सर्वांसमोर आणत आहेत.शुक्रवारी रात्री अज्ञात तीन चोरट्यांनी राहुरी फँक्टरी येथे दोन दुकाने फोडली.दोन्ही दुकाने फोडून चोरट्यांच्या हाथी मात्र काहीच लागले नाही.

         याबाबत सविस्तर माहिती अशी की,राहुरी फँक्टरी येथिल डाँ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील श्रीरामपूरकडे जाणाऱ्या रस्त्यालगत शिवम फुटवेअर व साईदिप इलेक्ट्रिकल हि दोन दुकाने चोरट्यांनी फोडली आहे.गेल्या अनेक दिवसा पासून चोरट्यांनी राहुरी फँक्टरी येथिल दुकाने फोडण्याचा सपाटा लावला आहे.

       

 शिवम सोनवणे यांच्या मालकीचे शिवम फुटवेअर व किरण गायके यांच्या मालकीचे साईदिप इलेक्ट्रिकल दुकान अज्ञात तीन चोरट्यांनी फोडले या ठिकाणी दोन्ही दुकानात उचका पाचक करुन चोरट्यांना मात्र रोख सापडली नसल्याने चोरट्यांना येथून रिकाम्या हाथी जावे लागले. दोन दिवसापुर्वीच याच मार्गावरील रामचंद्र काळे यांच्या घरा समोरुन मालवाहू पिकप टेंपो  चोरी जाण्याची घटना ताजी असताना चोरट्यांनी दोन दुकाने फोडून पोलिसांना आव्हान दिले आहे.शुक्रवारी रात्री दोन्ही दुकाने फोडताना चोरटे सीसीटिव्ही कँमेऱ्यात कैद झाले आहे.चोरट्यांनी तोडांला पांढरे फडके बांधलेले असल्याचे चेहरापट्टी ओळखता येत नाही.चोरट्यांनी दुकाना समोरील सीसीटिव्ही कँमेरे तोडून टाकले आहेत.राहुरी फँक्टरी परिसरात दिवसेंदिवस  चोऱ्यांचे प्रमाण वाढत चालले आहे.आज पर्यंत परिसरात झालेल्या चोऱ्यांपैकी एका ही चोरीचा तपास पोलिसांना लावता आला नाही.

       नगर मनमाड महामार्गावरील राहुरी फँक्टरी परिसरातील पथदिवे गेल्या तीन महिण्या पासून बंद अवस्थेत असून नगर पालिकेचे दुर्लक्ष असून महामार्गावरील अंधाराचा फायदा घेवून चोरट्यांनी या भागातील दुकांनांवर लक्ष केले आहे.पोलिसांची निषक्रीयता जनते समोर आली असून झालेल्या चोऱ्या पैंकी एका ही चोरीचा तपास लावता आला नाही.परिसरात गस्त नसल्यामुळे चोरट्यांना चोरी करण्यासाठी मोकळे राण मिळत आहे.

               राहुरी फँक्टरी  परिसरात व्यापारी वर्गांच्या तीन वेगवेगळ्या संघटना असून सतत होत असलेल्या चोऱ्या बाबत एकाही संघटनेने आवाज उठविला नाही.हि खेदाची बाब आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here