शिवाजी नागरी बॅंकेच्या वतीने तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

0

पैठण प्रतिनिधी : पैठण येथील शिवाजी नागरी बॅंकेच्या वतीने तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुरूवार (ता.२६) रोजी माहेश्वरी भक्त निवास येथील सभागृहात आयोजित करण्यात आला होता. शिवाजी नागरी सहकारी बँकेतर्फे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त तालुक्यातील इ. १० वी व १२ वी इयत्तेतील उच्चतम गुणवत्तेनुसार उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा गुरूवार रोजी छत्रपती संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांच्या  प्रमुख उपस्थिती पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी नागरी बँकेचे चेअरमन रविंद्र शिवाजीराव काळे तर प्रमुख पाहुणे म्हणून सहायक निबंधक बलराम नवथर उपस्थित होते.

या प्रसंगी मार्गदर्शन करताना अंजली धानोरकर उपजिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांनी सांगितले की,यश अपयश जीवनात येतील कधी अडचणी येतील पण त्या सगळ्यांवर मात करून आपल्याला पुढे जायचं आहे.परिस्थितीतून आपण इथपर्यंत आलो आहोत कारण आपल्याला तेव्हा अपयशाची भीती नव्हती लोक काय म्हणतील याचा विचार करायचा नाही आपण पुढे चालत राहायचं.

   

यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक व मुख्याध्यापक, प्राचार्य यांचा मेडल व प्रमाणपत्र देऊन सन्मान  करण्यात आला. कार्यक्रमास तालुक्यातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमांस व्हाईस चेअरमन  भाऊसाहेब औटे, संचालक हरीपंडीत गोसावी, रामचंद्र काळे, पाशा धांडे, पृथ्वीराज चौहान, शंकरराव राऊत, अरुण नरवडे,  अशोक जाधव, दशरथ सोनवणे, श्यामसुंदर लोहिया, राजेंद्र टेकाळे, कारभारी लोहकरे, सौ. तनुजा जाधव, तज्ञ संचालक अॅड. राजेंद्र धरपळे, गणेश शिलवंत, अॅड. किशोर वैद्य, दत्तात्रय फटांगडे, माजी नगरध्यक्ष सोमनाथ परदेशी, माजी नगरसेवक हसनुद्दीन कट्यारे, फाजल टेकडी,राजू निवारे, उदय काळे, प्रा. संतोष     गव्हाणे,सोमनाथ जाधव, ज्ञानेश्वर पानखडे आप्पासाहेब सोनवणे, लक्ष्मण चौरे, प्रकाश निवारे सह आदी उपस्थित होते सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ई.आय. पठाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणपत म्हस्के, संतोष पाटील राऊत,सुधाकर शिंदे, विजय पोषणगीर, कृष्णा काकडे, अमोल काळे, रेवती रांजनीकर, रत्नदीप मुळे, बाळू दसपुते,किशोर धोकते, आबेद पठाण, भाऊसाहेब कणसे, आशिष पवार, फौजी जाधव सह आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here