शिवसेना उरण शहरातर्फे  निराधार व गरीब महिलांना शीरखुरमाचे साहित्य वाटप.

0

माजी आमदार  मनोहर शेठ भोईर यांच्या हस्ते केले वाटप.

उरण दि 21(विठ्ठल ममताबादे ) सध्या रमजान चा पवित्र महिना सुरू आहे आणि शनिवारी रमजान ईद आहे यानिमित्त उरण शहरातील मुस्लिम मुल्ला विभागातील गरीब व निराधार मुस्लिम महिलांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर व गटनेते गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना अल्पसंख्यांक सेलच्या तालुकाध्यक्ष हुसेना शेख व महिला आघाडी तालुका उपसंघटिका मनीषा ठाकूर यांच्या सहकार्याने शीरखुरमाचे साहित्य वाटप करण्यात आले.या शीरखुरमा साहित्याचे माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या शुभहस्ते गुरुवार दिनांक 20 एप्रिल 2023 रोजी वाटप करण्यात आले, यावेळी महिलांनी समाधान व्यक्त करून शिवसेनेचे आभार मानले आहेत.

यावेळी उरण शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, महिला तालुका उपसंघटिका मनीषा ठाकूर, अल्पसंख्यांक सेलच्या तालुकाध्यक्ष हुसेना शेख, युवासेना शहरप्रमुख नयन भोईर, निष्ठावंत शिवसैनिक  नितीन ठाकूर व कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here