नगर – एमआयडीसी येथील स्नेहालयात चाईल्ड लाईनच्या 20 वर्धापन दिनानिमित्त बाल संरक्षण 2023 च्या पुरस्काराने योगेश पिंपळे यांना प्रशस्तीपत्रक, स्मृतीचिन्ह, पुस्तके भेट देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी बालकल्याण समिती अध्यक्ष अॅड. जयंत ओहोळ अॅड.अनुराधा येवले, अॅड.प्रज्ञा हेेंद्रे, अॅड. भाग्यश्री जरंडीकर, संध्या राशिनकर, हनीफ शेख, शाम आसावा, प्रविण मुत्याल, दत्तात्रय कवळे, विकेश निमांडे, वैभव देशमुख, राजेंद्र वारे, संजय गुगळे, राजीव गुजर आदि उपस्थित होते.
यावेळी बाल कल्याण समितीचे अध्यक्ष जयंत ओहोळ यांनी गेल्या 20 वर्षात चाईल्ड लाईनने केलेल्या कामांचा आढावा घेतला. तसेच विविध उपक्रमांची माहिती दिली. पिंपळे यांनी बाल कामगार, बाल विवाह रोखण्यासाठी प्रयत्न करुन, बाल गुन्हेगारी बाबत चाईल्ड लाईनच्या माध्यमातून गुन्हेगारी प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या कार्याबद्दल पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला असल्याचे सांगितले.
सत्काराला उत्तर देतांना योगेश पिंपळे म्हणाले, मुले ही देवाघरची फुले असतात. मुलांचा आनंद हीच ईश्वर सेवा समजून सुदृढ व सशक्त बालके ही देशाचे भवितव्य आहेत. त्यांना सामाजिक भावनेतून निकोप वातावरण निर्माण करुन त्यांचे शोषण थांबविण्याचे काम आमची समिती करत आहे. या कार्यात गेल्या अनेक वर्षांपासून काम करतांना सेवाभावी दृष्टीकोनातून केलेल्या कामामुळे आपण समाधानी असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे आयोजन व यशस्वीतेसाठी महेश सुर्यवंशी, अलिम पठाण, शाहिद शेख, अब्दुल खान, राहुल कांबळे, राहुल वैराळ, मंजुषा गावडे, सीमा कांबळे, वसीम शेख, उषा खोल्लम, नितीन वावरे, अमोल धावडे, प्राची धावडे, विकास सुतार, संदिप क्षीरसागर यांनी परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन शुभांगी माने यांनी केले तर स्नेहालयाचे अध्यक्ष संजय गुगळे यांनी सर्वांचे आभार मानले.