शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्ष उरण तर्फे इफ्तारी पार्टीचे आयोजन.

0

माजी आमदार मनोहरशेठ भोईर व गटनेते गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन.

उरण दि 21(विठ्ठल ममताबादे )शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या उरण तर्फे पवित्र अशा रमजान महिन्यात माजी आमदार तथा शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे )जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर व गटनेते  गणेश शिंदे यांच्या सहकार्याने शिवसेना उरण तर्फे इफ्तारी पार्टीचे आयोजन बुधवार दिनाकं 19 एप्रिल 2023 रोजी रोजा उपवास संपल्यावर संध्याकाळी सात वाजता स्वातंत्र्य सैनिक दत्ता रहाळकर मैदान, बोरी येथे करण्यात आले होते.सदर इफ्तारी पार्टीत मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी सहभाग घेऊन आपला उपवास सोडला.

यावेळी गटनेते गणेश शिंदे,उरण शहर संपर्कप्रमुख  गणेश म्हात्रे, नगरसेवक अतुल ठाकूर, समीर मुकरी, विकी म्हात्रे, अल्पसंख्याक सेलचे विधानसभा अध्यक्ष एजाज मुकादम,उद्योजक रमजान शेख, शाखाप्रमुख नियाज भाटकर, काफील फसाठे, इस्माईल शेख, उपशाखाप्रमुख शाहरुख गडी, गटप्रमुख समीम खान व मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. इफ्तारी पार्टीचे आयोजन युवासेना उरण उपशहरप्रमुख अशफाक खान व कार्यकर्ते यांनी केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here