पोहेगांव प्रतिनिधी : कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे सोनेवाडी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त सोनेवाडी पतसंस्था व एस जे एस हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये परिसरातील शेकडो रुग्णांची मोफत तपासणी करत औषधे उपलब्ध करून देण्यात आले. कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते रुग्ण तपासणी शिबिरांची सुरवात करण्यात आली.
सोनेवाडी पतसंस्थेच्या माध्यमातून परिसरातील रुग्णाची तपासणी उपक्रम हा अत्यंत स्तुत्य असून पतसंस्थेच्या प्रत्येक वर्धापन दिनाच्या निमित्ताने या उपक्रमाचे आयोजन केले पाहिजे असे शंकरराव चव्हाण यांनी सांगितले . यावेळी यावेळी कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष काकासाहेब जावळे, सोनेवाडी सोसायटीचे संचालक निरंजन गुडघे, उपसरपंच संजय गुडघे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजेंद्र गुडघे, शिवाजी जावळे, विठ्ठल जावळे, माजी सरपंच विजय जगताप, पोलीस पाटील दगू गुडघे,संतोष गुडघे, सोनेवाडी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे संस्थापक किशोर जावळे, अध्यक्ष दिपक जावळे, उपाध्यक्ष सोमनाथ रायभान, संचालक कर्णासाहेब जावळे, अजित जावळे, दिलिप माकोणे, शिवाजी दहे, वैभव खोमणे,बबलु जावळे, सिताराम जावळे, संस्थेचे व्यवस्थापक ज्ञानदेव कुऱ्हाडे अदी उपस्थित होते.
शिबिरामध्ये डॉ सायली ठोंबरे, डॉ अनिरुद्ध उबाळे, डॉ श्रीमती काळे, डॉ .मेहेरमानसिंग, डॉक्टर मराठे, डॉक्टर समृद्धी मोरके, डॉ रक्ताटे, साईप्रसाद पाचोरे, विलास पवार यांनी रुग्णांच्या विविध आजाराची तपासणी करत. मोफत औषधे उपलब्ध करत पुढील तपासणीसाठी योग्य मार्गदर्शन केले. या मोफत सर्व रोग निदान शिबिरामध्ये हृदयविकार, मेंदू विकार, हाड, डोळे, दात, जनरल तपासणी करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर जावळे यांनी केले तर आभार व्यवस्थापक ज्ञानदेव कुऱ्हाडे यांनी मानले.