IPL 2025 KKR Vs RCB fans request everyone to wear Test White jersey to give a great tribute to Virat Kohli

0

[ad_1]

IPL 2025 Virat Kohli KKR Vs RCB: कसोटी क्रिकेटला नवसंजीवनी देणाऱ्या विराट कोहलीने 12 मे रोजी तडकाफडकी निवृत्ती जाहीर केल्यानंतर भारताबरोबरच जगभरातील क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला. विराट कोहली इंग्लंडविरुद्धची पाच कसोटी सामन्यांची मालकी नक्की खेळेल असा विश्वास चाहत्यांना होता. मात्र विराटने अचानक इन्स्ताग्रामवर पोस्ट करत कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. विराटच्या काही दिवस आधीच रोहित शर्मानेही अशाचप्रकारे आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून अंतरराष्ट्रीय कसोटी कारकि‍र्दीचा शेवट करत असल्याचं जाहीर केलेलं. विराट आणि रोहितने अचानक कसोटीमधून एक्झीट घेतल्याने भारतीय चाहते एकीकडे नाजार असल्याचं चित्र दिसत आहे तर दुसरीकडे आता या दिग्गज खेळाडूंच्या चाहत्यांनी आयपीएलदरम्यानच एक वेगळा प्लॅन आखला आहे.

बंद पडलेलं आयपीएल पुन्हा सुरु होणार; चाहत्यांनी केली अनोखी तयारी

भारत-पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे आठवडाभर स्थगित केलेली आयपीएलची स्पर्धा 17 मे पासून पुन्हा सुरु होत आहे. बीसीसीआयकडून नवीन वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. नव्या वेळापत्रकामधील पहिलाच सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्सदरम्यान खेळवला जाणार आहे. विशेष म्हणजे कोहलीच्या आयपीएल संघाचा हा सामना होम ग्राऊण्डवर म्हणजेच बंगळुरुमधील चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. विराट आणि रोहित शर्माने निवड समितीवर नाराज होऊन तडकाफडकी राजीनामा दिल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. तसेच विराट आणि रोहितला किमान एक निरोपाचा सामना खेळू द्या अशी विनंतीही बीसीसीआयकडे केली जात आहे.

बीसीसीआय ही मागणी मान्य करणार का वगैरे हा दूरचा विषय असला तरी शनिवारच्या आय़पीएलच्या सामन्यासाठी विराटच्या चाहत्यांनी विशेष तयारी केली आहे. बीसीसीआयने विराटला निरोपाची कसोटी नाकारल्याची भावना चाहत्यांमध्ये असली तरी आता तेच विराटने निवृत्ती जाहीर केल्यानंतरचा आयपीएलमधील त्याचा पहिला सामना निरोपाचा सामना म्हणून अनोख्या पद्धतीने साजरा करणार आहेत. 

नेमकं काय आवाहन करण्यात आलं आहे?

बंगळुरु आणि कोलकात्याच्या सामन्यात कसोटी क्रिकेटमध्ये वापरली जाते ती पांढरी जर्सी किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करुन येण्याचं आवाहन चाहत्यांना करण्यात आलं आहे. “आरसीबीच्या पुढच्या सामन्याला सर्व चाहत्यांना कसोटीमधील पांढरा रंग मैदानात घालून येण्यासाठी प्रोत्साहन देऊयात, हा विराटसाठी योग्य ट्रेब्यू ठरेल नाही का? त्याच्यामुळे आपल्यापैकी अनेकजण कसोटी क्रिकेटच्या प्रेमात पडले. आता त्याला कधीच पांढऱ्या कपड्यांमध्ये खेळताना चाहत्यांना पाहता येणार नाही. मात्र त्याच्या आवडत्या फॉरमॅटमध्ये त्याला पाहणं आमच्यासाठी किती प्रेम आणि आनंद देणारं होतं हे त्याला चाहते म्हणून या सामन्यातून आपण दाखवून देऊ शकतो. विराटच्या कारकि‍र्दीमधील आकडेवारीपेक्षाही त्याने चाहत्यांच्या हृदयामध्ये स्थान मिळवलं आहे, हे आपण दाखवून देऊयात. याबद्दल विचार करा आणि हे सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करावा,” अशी पोस्ट व्हायरल केली जात आहे. 

खरोखरच असं झालं तर चिन्नास्वामीमधील चित्र कसं असेल याचे फोटोही चाहत्यांनी एआयच्या मदतीने तयार केलेत. खरंच हे असं झालं तर विराट स्वत: डोळे विस्फारुन हे सारं चित्र डोळ्यात साठवून ठेवेल असंही चाहत्यांनी म्हटलं आहे.

विराटची कारकिर्द कशी?

कसोटीमध्ये विराटने 123 सामने खेळले असून त्यात त्याने 210 डावांमध्ये फलंदाजी केली आङे. विराटच्या नावावर 9230 धावा असून त्याची सर्वोच्च धावसंख्या 254 नाबाद इतकी आहे. विराटने कसोटीमध्ये 46.9 च्या सरासरीने धावा केल्या. यामध्ये त्याचा स्ट्राइक रेट 55.6 चा होता. विराटच्या नावावर कसोटीमध्ये 30 शतकं असून एकूण 31 वेळा त्याने अर्धशथकं झळकावली आहेत. विराटने कसोटीमध्ये 1 हजार 27 चौकार लगावते आणि 30 षटकार लगावले आहेत. विराटने घेतलेला निवृत्तीचा निर्णय अनेक चाहत्यांच्या मनाला चटका लावून गेलाय.



[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here