[ad_1]
CBSE Board Exam Vaibhav Suryavanshi: इंडियन प्रिमिअर लीगच्या 18 व्या पर्वामध्ये सर्वात कमी वयात शतक झळकावण्याचा पराक्रम करणारा वैभव सूर्यवंशी पुन्हा चर्चेत आला आहे. खरं तर वयाच्या 14 व्या वर्षी क्रिकेटच्या मैदानात उतरताना वैभववर अनुभवी गोलंदाजांसमोर खेळण्याचं दडपण असेल असं मानलं जात होतं. मात्र घडलं उलट. या तरुण खेळाडूने सर्वांनाच आपल्या धडाकेबाज फलंदाजीने आश्चर्यचित केलं. सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा विक्रम या पठ्ठ्याने आपल्या नावावर करुन घेतलं.
आयपीएलमधील पहिल्याच चेंडूवर षटकार लगावत ‘मूर्ती लहान पण किर्ती महान’ प्रकारचे खेळाडू असल्याचा इशारा वैभवने आयपीएलच्या पदार्पणातच दिली. मात्र क्रिकेटच्या मैदानात हिरो असलेला वैभव आता दहावीचा निकाल लागल्यानंतर अभ्यासात झिरो आहे का असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. वैभवच्या बोर्डाचा निकाल समोर आल्याची बातमी व्हायरल झाल्याने ही चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
व्हायरल पोस्टमध्ये काय म्हटलं आहे?
एका पोस्टमध्ये वैभव सूर्यवंशीच्या निकालासंदर्भातील बातमी व्हायरल झाली आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये, “एका आश्चर्यकारक घटनेमध्ये 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी 10 वीच्या सीबीएसई बोर्डाच्या निकालात नापास झाला आहे. बीसीसीआयने या संदर्भात एक असामान्य पाऊल उचललं आहे. संभाव्य मूल्यांकनातील त्रुटींबद्दल चिंता व्यक्त केली असून औपचारिकता म्हणून वैभवच्या उत्तरपत्रिक डीआरएस- पद्धतीप्रमाणे पुन्हा विचारात घेतल्या जाव्यात, अशी मागणी केली आहे,” असा दावा करण्यात आला आहे.
म्हणजेच वैभव सूर्यवंशी बोर्डाच्या परीक्षेत नापास झाल्याच्या बातम्या व्हायरल झाला आहेत. खरं तर वैभव हा दहावीत नापास झालेला नाही तसेच तो पास होऊन 11 व्या इयत्तेत गेलाय असंही नाही. मग या व्हायरल पोस्टमागील सत्य आहे तरी काय?
पोस्टमागील सत्य काय?
वैभव सूर्यवंशी नापास झाल्याची जी पोस्ट व्हायरल होतेय ती एक उपाहासात्मक पोस्ट आहे. कॅप्शनमध्येच वैभव सूर्यवंशी नापास झाल्याची बातमी खोटी असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. हे एक उपहासात्मक व्यंगासंदर्भातील पेज असून ही बातमी गंमत म्हणून शेअर करण्यात आल्याचं पोस्टच्या शेवटी म्हटलं आहे.
धोनी, विराट, रोहितलाही न जमलेली कामगिरी
आता वैभव खरंच दहावीच्या परीक्षेत पास झालाय की नापास हा प्रश्नच चर्चेत नसण्याचं कारण म्हणजे बातम्यांनुसार, वैभव आता नवव्या इयत्तेत शिकत आहे. वैभव हा वयामुळे चर्चेत आला आहे. मात्र त्याने आयपीएलमध्ये विक्रमी कामगिरी करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनीसारख्या खेळाडूंना जमलं नाही ते वैभवने करुन दाखवलं आहे. वैभवने 35 चेंडूंमध्ये शतक झळकावलं. हे आयपीएलच्या इतिहासातील दुसरं सर्वात वेगवान तर भारतीयाने झळकावलेलं सर्वात वेगवान शतक आहे.
[ad_2]