why shubman gill has been picked as test captain ahead of bumrah ajit agarkar given reason

0

[ad_1]

IND VS ENG : जून महिन्यात भारतीय संघ 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळण्यासाठी इंग्लंड दौरा करणार आहे. भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात 20 जून पासून ही टेस्ट सीरिज होणार असून या सीरिजसाठी बीसीसीआयने आज टीम इंडियाची (Team India) घोषणा केली. भारताचा टेस्ट कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) काही दिवसांपूर्वी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, त्यामुळे शुभमन गिलला (Shubman Gill) टीम इंडियाचा नवा टेस्ट कर्णधार बनवण्यात आले. शुभमन हा टीम इंडियाच्या टेस्ट संघाचा 37 वा कर्णधार आहे. तर ऋषभ पंतला उपकर्णधार करण्यात आलं आहे. जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा यांची नावं भारतीय संघाचा नवा टेस्ट कर्णधार म्हणून समोर येत असताना सर्वांचा विरोध डावलून शुभमन गिलला कर्णधार करण्यात आलं. तेव्हा गिलला टेस्ट कर्णधार करण्यामागे नेमकं काय कारण होतं याविषयी पत्रकार परिषदेत चीफ सिलेक्टर अजित आगरकर यांनी उत्तर दिलं. 

जसप्रीत बुमराहला भारत – ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवण्यात आलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2024-25 मध्ये उपकर्णधार करण्यात आलं होतं. तसेच  रवींद्र जडेजाला सुद्धा टेस्ट क्रिकेट खेळण्याचा बराच अनुभव आहे. त्यामुळे या दोघांपैकी कोणा एकाला रोहित शर्मानंतर टेस्ट संघाचं नेतृत्व करण्याची संधी देण्यात येईल अशी अपेक्षा काही दिग्गज क्रिकेटर्सनी सुद्धा व्यक्त केली होती. मात्र सिलेक्टर कमिटीने सर्वांना डावलून शुभमनला कर्णधारपदाची संधी दिली. 

हेही वाचा : इंग्लंड दौऱ्यात मोहम्मद शमीला संधी का दिली नाही? 3 मोठी कारणं आली समोर

 

टीम इंडियाचे  चीफ सिलेक्टर अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत शुभमनला कर्णधार का केलं याचं उत्तर दिलं. ते म्हणाले, ‘तुम्ही एक किंवा दोन दौऱ्यासाठी कर्णधाराची निवड करत नाही. तुम्ही अशा गोष्टीमध्ये गुंतवणूक करता, जी आम्हाला पुढे जाण्यासाठी मदत करेल. आम्ही आशा करतो की हा योग्य निर्णय असेल. तुम्ही मागील एक किंवा दोन वर्षांपासून प्रगती पाहतच असाल. 

आगरकरने पुढे म्हणाले की , ‘बहुदा शुभमनला काम करता करता शिकावे लागेल. पण आम्हाला त्याच्यावर विश्वास आहे आणि म्हणूनच आम्ही त्याची निवड केलीये’.  चीफ सिलेक्टर अजित आगरकर यांनी संघाची घोषणा करताना कबूल केले की रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन यांच्या टेस्ट क्रिकेटमधील निवृत्तीने संघात मोठी उणीव निर्माण झाली आहे. 

भारताचा टेस्ट संघ : 

शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार) (विकेटकिपर ), यशस्वी जयसवाल, के. एल. राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू अस्वर्णा, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, ध्रुव जुरेल (विकेटकिपर ), वॉशिंग्टन सुंदर,शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव



[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here