When, where and what time will the final match of IPL 2025 be held between RCB vs PBKS | कधी, कुठे आणि किती वाजता होणार IPL 2025 चा अंतिम सामना? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

0

[ad_1]

आयपीएल (IPL 2025) च्या अंतिम सामन्याची सर्व क्रिकेटप्रेमींना उत्सुकता आहे. या वर्षीच्या अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि पंजाब किंग्स (PBKS) या दोन संघांमध्ये सामना होणार आहे. या दोन्ही संघांनी अद्यापपर्यंत आयपीएलचे विजेतेपद मिळवलेले नाही, त्यामुळे 2025 मध्ये एक नवीन विजेता मिळणार आहे.  आयपीएल २०२५ चा अंतिम सामना 3 जून 2025 रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या रोमांचक सामन्यामुळे 22 मार्च 2025 रोजी सुरू झालेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या रोमांचक हंगामाचा शेवट होईल.

स्पर्धेत झाले 74 सामने

या लीगमध्ये अनेक आठवड्यांपासून दहा संघांमध्ये जबरदस्त स्पर्धा होत एकूण 74 सामने झाले. यामधून प्लेऑफसाठी पंजाब किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स हे  पात्र ठरलेले टॉप चार संघ होते. 

सामना कधी आणि कुठे?

आयपीएल 2025 चा अंतिम सामना 3 जून 2025 (मंगळवार) रोजी नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल.

 

थेट प्रक्षेपण आणि ऑनलाइन स्ट्रीमिंग कुठे बघता येईल?

सामन्याचा थेट प्रक्षेपण Star Sports नेटवर्क वर उपलब्ध असेल, ज्यामध्ये विविध भाषांमध्ये कॉमेंट्री ऐकता येईल. टीव्ही सोडून तुम्हाला ऑनलाइन सामना बघायचा असेल तर JioHotstar अ‍ॅप आणि वेबसाइटवर सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येईल.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध  पंजाब किंग्स 

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने क्वालिफायर एक मध्ये पंजाब किंग्सला हारवून अंतिम फेरीत प्रवेश केला. तर दुसरीकडे, पंजाब किंग्स संघाने क्वालिफायर दोन मध्ये मुंबई इंडियन्सवर विजय मिळवून अंतिम फेरीत स्थान मिळवले.

 

या सामन्यातील विजेता IPL चा नवीन चॅम्पियन ठरेल, त्यामुळे हा सामना अत्यंत इंटरेस्टिंग आणि ऐतिहासिक ठरणार आहे.



[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here