ipl 2025 final rcb vs pbks virat kohli break down after rcb won ipl championship after 17 years

0

[ad_1]

IPL 2025 Final : आयपीएल 2025 चा फायनल सामना पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये (PBKS VS RCB) पार पडला. या सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्सवर 6 धावांनी विजय मिळवून आयपीएलचं विजेतेपद पटकावलं आहे. यासह आरसीबीने त्यांचा आयपीएलमधील 18 वर्षांचा दुष्काळ संपवला आहे. आयपीएलमध्ये आरसीबीने पहिल्यांदाच विजेतेपदाचा मान मिळवला. या विजयानंतर आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीला अश्रू अनावर झाले. त्याने मैदानात पत्नी अनुष्का शर्माला मिठी मारून आपल्या भावना व्यक्त केल्या. 

फायनल सामन्याचा टॉस पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने जिंकला. त्याने प्रथम गोलंदाजी निवडून आरसीबीला फलंदाजीचं आव्हान दिलं. आरसीबीने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 190 धावा केल्या. तर पंजाबला आयपीएल विजयासाठी 191 धावांचे आव्हान दिले. हे आव्हान पूर्ण करण्यात पंजाब किंग्सला अपयश आलं. त्यामुळे आरसीबीचा 6 धावांनी विजय झाला. आरसीबीच्या गोलंदाजांनी पंजाब किंग्सच्या 9 विकेट घेतल्या. 

पाहा व्हिडीओ : 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची प्लेईंग 11 : 

फिलिप सॉल्ट, विराट कोहली, मयंक अग्रवाल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकिपर), रोमॅरियो शेफर्ड, क्रुणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, जोश हेजलवुड

पंजाब किंग्सची प्लेईंगची मॅचसाठी 11 : 

प्रियांश आर्य, जोश इंग्लिस (विकेटकिपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, अजमातुल्ला ओमरझाई, काइल जेमिसन, विजयकुमार व्यास, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल



[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here