
देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
संताना त्याग बलिदान परीश्रमा शिवाय धार्मिकतेत न्याय मिळाला नाही.ज्ञानेश्वरांना धार्मिक व्यवस्थेसाठी बलिदान द्यावे लागले तेव्हा न्याय मिळाला. याच संतानी जगासाठी खुप काही करुन ठेवले.सर्व समाजाला एकत्र आणण्याचे काम विठ्ठलाची वारीच करते.असे ह.भ.प. महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी सांगितले.
देवळाली प्रवरा येथिल श्री योगीराज ञिंबकराज पायी दिंडी सोहळ्याची सांगता निमित्त ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक यांचे काल्याचे किर्तन आयोजित करण्यात आले होते. किर्तनसेवेसाठी संत निळोबा महाराज यांच्या गौळण प्रकरणातील अभंग बोलती चालती देखती ऐकति । सर्वत्री श्रीपती त्यांचे दृष्टी ॥१॥ सासुरे माहेर सासु सासरा दीर । देखती त्या भ्रतार हरीच्या रुपें ॥२॥ सोयरेसज्जनइष्टमित्रजन । कन्याकुमरेधन कृष्णचि गोत ॥३॥ निळा म्हणे त्यांचे संपत्ति वैभव | पशुवादिक सर्व झाला कृष्ण ॥४॥ निवडण्यात आला होता.
पंढरपूरची वारी म्हणजे वारकरी सांप्रदायातील संस्कृतीची ओळख आहे.सर्व जाती धर्माला एकञ जोडणारा वारकरी समाजाचा उत्सव आहे.श्री योगीराज ञिंबकराज दिंडी सोहळा महाराष्ट्रातील दिंडी सोहळ्यातील आर्दश दिंडी सोहळा आहे.दिंडी सोहळा सांगता प्रसंगी काल्याची किर्तन सेवा आर्दश व परंपरासेवा आहे.देवळाली प्रवरा गावाला धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय परंपरा आहे. योगायोगाने तरुण पिढी धार्मिक कार्यक्रमाची धुरा सांभळतात हि महत्वाची गोष्ट आहे. ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक यांनी सांगितले.
किर्तनसेवे दरम्यान दुष्टांत देताना पंढरीच्या वारीचे वर्णन शब्दात करणे अवघड आहे.त्याचा अनुभव आनंद घ्यावा लागतो. सतांनी जातीचा विचार केला नाही,ना जात सांगितली,ना कोणाला जात विचारली परमार्थात सेवक म्हणुन काम केले आहे. देवळाली प्रवरा या गावातुन योगिराज ञिंबकराज, बाबुराव पाटील, संत महिपती महाराज दिंडीचे चालक देवळालीतील आहे.म्हणून हे गावच भक्तीच्या रसाने भरलेले आहे. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही असे ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक यांनी सांगितले.
यावेळी टेंभुर्णी येथिल मधुकर बाबूराव कुटे यांच्या कुटूंबातील वर्षाताई अनंतराव कुटे यांनी प्रथमच पांडूरंगाची वारी केली.वारी मधील अनुभव त्यांनी सांगितला.आमचा परिवार दिंडीची अनेक वर्षा पासून सेवा करतो.मात्र प्रत्याक्षात वारीचा अनुभव नव्हता.दिंडीचा अनुभव सांगताना त्या म्हणाल्या की, पायी वारीतील सुख समाधान काय असते ते या वारीतून समजले.आज पर्यंतच्या वारीतील फार मोठ्या आनंदाला मुकले.पायी वारीत चालता बोलता सर्वांच्या तोंडी विठ्ठल नामाचा उल्लेख होतो.प्रत्येकामध्ये एकमेकांना पांडूरंग दिसतो.जीवनात वारीला अनन्य साधारण महत्व आहे.
यावेळी दिंडीचे संस्थापक सीताराम ढुस,दिंडीचे अध्यक्ष भाऊसाहेब कदम,उपाध्यक्ष बाबा महाराज मोरे,सचिन ढुस तसेच भाजपाचे प्रांत सदस्य आसाराम ढुस, साई आदर्श मल्टीस्टेटचे अध्यक्ष शिवाजीराव कपाळे, फ्रांसिस संसारे, मंजाबापू वरखडे, बाबानंद महाराज वीर,बाबासाहेब महाराज वाळुंज, नामदेव महाराज शास्त्री जाधव, बापू महाराज कोतकर, विलास महाराज कोतकर, माजी नगराध्यक्ष मुरलीधर कदम,माजी उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चोथे,सुखदेव मुसमाडे, अशोकराव खुरुद, राजेंद्र लोंढे,डॉ. अशोक मुसमाडे, भगवान महाराज मोरे, किशोर महाराज निर्मळ, गितामाई धसाळ,रामदास महाराज देठे,सुदाम भांड, भगवानसिंग चंदेल,नारायण झावरे,परसराम सप्रे,पोपटराव पवार,कांता पाटील कदम,राजेंद्र चव्हाण,रामचंद्र जवरे,बबन पटारे,रंगनाथ महाराज पांडे,डाँ.विठ्ठल शिंदे,नंदकुमार दिघे, नानासाहेब कोतकर, भाऊसाहेब कोतकर,बाबासाहेब कोतकर, ज्ञानदेव कोतकर, राजूभाऊ कोल्हे,बापूसाहेब जाधव,बाबासाहेब सांबारे,आदींसह देवळाली प्रवरा, लाख,जातप, आंबी, करजगाव, कोल्हार, लोणी, दवणगाव, बाभळेश्वर येथिल भक्तांसह पंचक्रोशीतील भाविक व भजणी मंडळ उपस्थित होते.
यावेळी माजी नगरसेवक सचिन ढुस यांनी दिंडी साठी मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.तसेल पुढील वर्षी दिंडीचे रौप्य महोत्सव वर्ष साजरे करायचे असल्याने सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.दिंडीसाठी झालेल्या खर्चाचा ताळेबंद सर्वांन समोर ठेवला.